शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

काजूला शासनाने हमीभाव ठरवून द्यावा, शिवसेनेची कृषीमंत्र्यांकडे मागणी

By सुधीर राणे | Updated: July 21, 2023 16:08 IST

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यात चारितार्थासाठी अग्रक्रमाने काजू या पिकाचे उत्पादन घेतले जाते. परंतु ,व्यापारी आणि कारखानदार यांच्यात संगनमत असून काजू ...

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यात चारितार्थासाठी अग्रक्रमाने काजू या पिकाचे उत्पादन घेतले जाते. परंतु ,व्यापारी आणि कारखानदार यांच्यात संगनमत असून काजू दर त्यांच्यामार्फत ठरविला जातो. त्यामुळे काजूला शासनाने हमीभाव ठरवून द्यावा अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्यासह शिष्टमंडळाने राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली. मुंबई येथे कृषीमंत्र्यांची भेट घेऊन याबाबत त्यांनी निवेदन दिले. यावेळी कणकवली विधानसभा मतदार संघ प्रमुख संदेश सावंत-पटेल, बापू धुरी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की,  शासनाकडून शेती उत्पादनासाठी प्रोत्साहन म्हणून अनुदान देऊन शेती करण्यास शेतकऱ्यांना प्रवृत्त केले जाते. परंतु प्रत्येक वेळी नुकसान होते. त्यामुळे शेतकरी शेती पासून लांब जात आहे. गोवा राज्य शासनाने  काजूसाठी प्रति किलो १५० रूपये हमीभाव जाहिर केला आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे काजू पिकाला हमीभाव प्रति किलो १८० रुपये मिळावा. सिंधुदुर्ग जिल्हयातील काजू बीला जी. आय. मानांकन मिळाले आहे. परकीय काजू बी व सिंधुदुर्ग जिल्हयातील काजू बी मधील घटकद्रव्ये व चव वेगळी आहे. काही कारखानदार ४० टक्के सिंधुदुर्गातील काजूगर व ६० टक्के परकिय काजूगर मिक्स करून पॅकेट बनवितात व सिंधुदुर्ग काजूगर म्हणून विकतात. त्यामुळे कारखानदारांना सक्त आदेश देऊन इंपोर्टेड व सिंधुदुर्ग जी. आय.मानांकन काजूगर याचा उल्लेख पॅकिंगवर करणे आवश्यक आहे. व्यापाऱ्यांच्या आडमुठे धोरणाने काजू बी दर ठरविणे चुकिचे आहे. या सर्व बाबींचा विचार करून जी. आय. मानांकन असणाऱ्या जिल्ह्यातील काजू बीला १८० रूपये हमीभाव द्यावा अशी मागणी करण्यात आली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDhananjay Mundeधनंजय मुंडे