देवगड (सिंधुदुर्ग) : देवगड तालुक्यातील मणचे येथील खाडीत आज, सोमवारी एक मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह कुंभवडे राजापूर तालुक्यातील कुंभवडे खाडीकिनारी सापडला. मृतदेहाच्या डोक्याला बॅटरी आहे. पोलिसांनी ओळख पटविण्यासाठी शोध सुरू केला आहे.मृतदेह नेमका कोणाचा याबाबत तपास सुरू आहे. अद्यापही याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान मृतदेह पाहता मासेमारीसाठी खाडीत आलेल्या नागरीकाचा असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. घटनेची माहिती माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला असून ओळख पटविण्याचे काम सुरू केले आहे.
देवगड-मणचे येथील खाडीत आढळला मृतदेह, पोलिसांकडून ओळख पटविण्यासाठी शोध सुरू
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 19, 2022 13:09 IST