शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

‘श्यामची आई’ आता चिनी भाषेत, तळेरेतील रसिका पावसकरांनी केला अनुवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 18:24 IST

पुन्हा एकदा तळेरे गाव आंतरराष्ट्रीयस्तरावर पोहोचले

निकेत पावसकरतळेरे : भारतीय तरुणाईच्या मनात आईविषयी प्रेम, वात्सल्य, भक्ती निर्माण करणारे ‘श्यामची आई’ हे पुस्तक आता चिनी भाषेत अनुवादित करण्यात आले आहे. ‘’अनाम प्रेम’’ तर्फे रविवारी (२९ जानेवारी २०२३) अनुवादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. मूळच्या तळेरे येथील असलेल्या रसिका प्रभाकर पावसकर यांनी या पुस्तकाचे अनुवादन केले आहे.रसिका प्रभाकर पावसकर या चीनच्या हनान प्रोविन्समधील “चंगचौ”  (zhengzhou) युनिव्हर्सिटीत चिनी भाषा शिकवण्याची पदवीशिक्षण घेत आहेत. एका व्रतस्थ व्यक्तीकडून झालेल्या मार्गदर्शनानुसार एका आईचे, पूज्य सानेगुरुजींचे व समाजाचे ऋण म्हणून रसिका पावसकर यांच्याकडून “श्यामची आई” चिनी अनुवादित करण्यात येत आहे.

हृदयस्थ व सत्य भावनेने भारलेली पुस्तके हृदयाला भिडतात, याची अनुभूती देणारी मराठीमध्ये अनेक पुस्तके आहेत. आई व मातृत्व यावरसुद्धा अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. अशा हृदयस्थ पुस्तकांमधे “श्यामची आई” चे स्थान गेली नऊ दशके अग्रगण्य आहे. “श्यामची आई”चे विविध भारतीय व परदेशी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. परंतु, चिनी भाषेत आतापर्यंत अनुवाद झाला नव्हता. त्यामुळे अनाम प्रेम परिवारातील रसिका प्रभाकर पावसकर हिने “श्यामची आई” या मराठी साहित्यातील पवित्र महन्मंगल पुस्तकाचा चायनीज भाषेमध्ये अनुवाद केला आहे.

मुंबईमध्ये २९ ला प्रकाशनचिनी भाषेत अनुवादित ‘श्यामची आई’चे प्रकाशन प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरातील पु. ल. देशपांडे कला अकादमी, मिनी थिएटर, तिसरा मजला येथे रविवारी, २९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे माजी मानद सचिव प्रा. डॉ. श्रीकांत बहुलकर, चायनीज युपेपे, जेन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.तळेरे गावाला समृद्ध वारसातळेरे गावाला सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, साहित्य असा समृद्ध वारसा आहे. हा वारसा आता रसिकांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीयस्तरावर पोहोचला आहे. त्यांच्यामुळे पुन्हा एकदा तळेरे गाव आंतरराष्ट्रीयस्तरावर पोहोचले आहे. रसिका यांनी मुंबई विद्यापीठातून इंग्रजी विषयातील कला शाखेची पदवी प्राप्त केली आहे आणि  चीनमध्ये हनान प्रोव्हिन्स चंगचौ (Zhengzhou) विद्यापीठामध्ये चायनीज भाषेमध्ये पदवीचे शिक्षण घेत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग