शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता अक्षयचा मृतदेह माडखोल धरणात सापडला, चिठ्ठीत मुंबईतील एका पोलीस उपनिरीक्षकासह नऊ जणांची नावे

By अनंत खं.जाधव | Updated: September 5, 2024 17:20 IST

इंजिनियर असलेल्या अक्षय साईल हा मंगळवारपासून बेपत्ता होता

सावंतवाडी : गाडीच्या अपघातानंतर सतत पैशांसाठी होणाऱ्या जाचाला कंटाळून कोलगाव भोमवाडी येथील अक्षय जनार्दन साईल (वय २८) या युवकाने माडखोल धरणात आत्महत्या केल्याचे गुरूवारी उघडकीस झाले. अक्षय मंगळवार पासून बेपत्ता होता. त्याची दुचाकी, चप्पल हे माडखोल धरण परिसरात आढळून आल्याने त्याचा शोध घेण्यात येत होता. अखेर त्याचा मृतदेह आज आढळून आला.दरम्यान या आत्महत्येच्या प्रकारानंतर कोलगाव ग्रामस्थ आक्रमक झाले असून अक्षयच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या व चिठ्ठीत उल्लेख असलेल्या संशयितांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे. पोलिसांकडून उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचा काम सुरू होते.कोलगाव येथील व्यवसायाने इंजिनियर असलेल्या अक्षय साईल हा मंगळवारपासून बेपत्ता होता. त्याच्या कुटुंबाने पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांकडून शोध सुरू होता. त्यातच अक्षयची दुचाकी चप्पल हे माडखोल धरण परिसरात आढळून आले. त्याने बेपत्ता होण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. अखेर अक्षयचा मृतदेह सापडल्यानंतर सर्वच गोष्टीचा उलगडा झाला.धमकी देणाऱ्यामध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश अक्षयची आत्महत्या गाडीच्या अपघातानंतर व्यवहारातून निर्माण झालेल्या वादातून झाल्याचे पुढे आले आहे. आपल्याला ब्लॅकमेलिंग व मारहाण केल्यामुळे आपला जीवन प्रवास संपवत आहे. असे सांगून तब्बल ९ जणांच्या नावाचा उल्लेख या चिठ्ठीत केला आहे. यातील काहि जण कोलगाव येथील तर ५ जण तर मुंबईमधील ४ असा त्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्याला धमकी देणाऱ्यामध्ये मुंबईतील एका पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश आहे. या सर्व प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर कोलगाव सरपंच संतोष राऊळ व अन्य ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत सावंतवाडी पोलीस ठाणे गाठले. यावेळी माजी आमदार राजन तेली हे ही उपस्थित होते. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार  हा सर्व प्रकार गाडीचा अपघात झाल्याच्या कारणावरून घडला आहे. मुंबईतील एका व्यक्तीची गाडी अन्य एकाला भाड्याला देण्यात आली होती. त्यात अक्षयाने मध्यस्थी केली होती. मात्र त्या गाडीचा अपघात झाला. त्यानंतर गाडीचा विमा देण्यासाठी विमा कंपनीने नकार दिला. त्यामुळे यातील तब्बल साडेआठ लाख रुपये हे अक्षय याच्याकडून वसूल करण्यासाठी तगादा लावण्यात आला होता. त्यातील तीन लाख रुपये घेण्यात आले. अन्य रक्कम ही देण्यासाठी त्याच्यावर जबरदस्ती करण्यात आली तसेच त्याला ब्लॅकमेलिंग करण्यात आले. या सर्व प्रकारानंतर अक्षयने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. स्टेटसवर चिठ्ठी, मित्रांना शेवटचे हायअक्षयने  झालेल्या मारहाणी नंतर नैराश्यातून चिठ्ठी लिहिली आणि संशयितांना व्हाट्सअपच्या माध्यमातून त्यांनी ही चिठ्ठी पाठवली व काही मित्रांना शेवटचे “हाय” असा मॅसेज टाकून आपल्या मोबाईलवर संशयितांचे फोटो आणि त्यांनी केलेले चॅटिंग स्टेटसवर ठेवले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस