शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीतील मोती तलावात आढळला तरूणाचा मृतदेह 

By अनंत खं.जाधव | Updated: December 2, 2023 15:33 IST

सावंतवाडी : सावंतवाडी मोती तलावात कोलगाव येथील अभिषेक अंकुश मेस्त्री (वय-40) या तरुणाचा मृतदेह आढळून आला. तो मूळ मालवण ...

सावंतवाडी : सावंतवाडी मोती तलावात कोलगाव येथील अभिषेक अंकुश मेस्त्री (वय-40) या तरुणाचा मृतदेह आढळून आला. तो मूळ मालवण - वराड येथील असून गेली काही वर्षे तो कोलगाव येथे राहत होता. गवंडीकाम कामगार असलेला हा तरुण मोती तलावाच्या काठावर बसलेला असताना तलावात कोसळला असावा, असा अंदाज सावंतवाडी पोलिसांनी व्यक्त केला आहे. शुक्रवार दुपारपासून तो बेपत्ता होता. दुपारी आपण बाजारात जातो असे सांगून तो घरातून बाहेर पडला होता. पण रात्र झाली तरी तो घरी परतला नाही. तो कोलगावची जत्रा असल्याने जत्रेला गेला असावा असे घरच्यांना वाटले. परंतु रात्री उशिरा देखील तो घरी परतलाच नाही.म्हणून त्यांची शोधाशोध ही करण्यात आली मात्र तो आढळून आला नाही. दरम्यान शनिवारी सकाळी सावंतवाडी नगरपालिकेचे कर्मचारी मोती तलावात साफसफाईसाठी उतरले असता त्यांना हा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. त्यांनी त्वरित पोलिसांना कळविल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. व मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.त्यानंतर उत्तरणीय तपासणी साठी येथील कुटीर रुग्णालयात हलविण्यात आला असून अधिक तपास सावंतवाडी पोलीस  करीत आहेत. मेस्त्री याच्या मागे  पत्नी, दोन मुली, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeathमृत्यू