शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: पावसाच्या सरी, सोसाट्याचा वारा अन् धुक्याची पळापळ; भुईबावडा घाटातील सौंदर्य खुलले

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 18, 2024 13:54 IST

वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी 

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातून घाटमाथ्यावर जाण्यासाठी चार घाट मार्ग आहेत. त्यापैकी आंबोली, फोंडा आणि करूळ या घाटांचा सर्वाधिक वापर होता. तर भुईबावडा घाटाला काहीसा दुर्लक्षितच राहिलेला आहे. मात्र, गेले दोन महिने करूळ घाटात रूंदीकरणाचे काम सुरू असल्याने भुईबावडा घाटातून वाहतूक वाढली आहे. निसर्गप्रेमींसाठी सध्या भुईबावडा घाटातील सौंदर्य खुलले असून पावसाळ्याच्या सुरूवातीलाच विशेषत: कोल्हापूर-राधानगरी परिसरातून या घाटात वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी पहायला मिळत आहे. कमी रहदारी, निसर्गसंपन्न प्रदेश, ठिकठिकाणी संततधार पडणारे धबधबे आणि दाट धुक्यांच्या सानिध्यातील हा घाट सौंदर्याच्या बाबतीत थोडा उजवाच आहे. सिंधुदुर्गातून जाताना खारेपाटणच्या अलिकडे मुंबई गोवा महामार्गावरून रस्ता आहे. तर वैभववाडी तालुक्यातून गगनबावडा घाटात जातानाही थोडीशी वाट वाकडी करून भुईबावडा घाटातून जाता येते. घाटाची लांबी अवघी ९ किलोमीटर असली तरी नैसर्गिक विविधतेमुळे घाटाचे सौंदर्य अधिकच खुलून जाते. भुईबावडा घाटातील निसर्गसौंदर्याचे ड्रोनच्या सहायाने टिपलेले छायाचित्र लक्ष वेधून घेत आहे.छोट्या मोठ्या धबधब्याच्या साथीने पुढे जाताना खडकांच्या कपारीत मोठा धबधबा आणि लगेच छोटे जलप्रवाह आपले स्वागत करतात. या ठिकाणी पार्किंगसाठीही विस्तीर्ण जागा आहे. रस्त्यासाठी फोडलेल्या खडकांमधून जागोजागे पाणी वाहते. थंडगार पाण्यात बसून अगदी सुरक्षितपणे धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुटता येतो. घाटमाथा जसजसा जवळ येवू लागतो तशी धुक्याची चादर अधिकच दाट होते. पावसाच्या सरी, सोसाट्याचा वारा आणि धुक्याची पळापळ पाहताना एक वेगळाच आनंद घेता येतो. भुईभावडा घाट सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एका टोकाला असला तरी अलिकडे वर्षा पर्यटनासाठी त्याला पसंती मिळत आहे.धुके कमी असले तरी श्री गगनगिरी मठाचे विहंगम दृश्य या घाटातून पहायला मिळते. सिंधुदुर्गातून सुरू होणारा हा रस्ता गगनबावडा एसटी बसस्थानकाजवळ येवून पोहोचतो. संपूर्ण घाटरस्त्याची ही सैर अवघ्या ३० ते ४० किलोमीटरमध्ये पूर्ण करता येते. घाट संपल्यानंतर ऐनारी या गावामध्ये गुहादेखील पाहता येते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूर