शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

देवगडमध्ये ठाकरे सेना-भाजपा कार्यकर्ते भिडले, आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत घडली घटना

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: October 10, 2023 00:20 IST

पाऊण तास संघर्षमय स्थिती, वातावरण तंग, धक्काबुक्की, मारहाणीचा प्रकार

महेश सरनाईक, सिंधुदुर्ग: देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्ण सल्लागार समितीच्या बैठकीच्यावेळी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत ग्रामीण रुग्णालयामध्येच उबाठा सेनेच्या व भाजपा कार्यकर्त्यांमध्ये प्रश्न विचारण्यावरून झालेल्या वादावादीचे रूपांतर धक्काबुक्कीमध्ये झाले. पाऊणतास चाललेल्या या संघर्षमय वातावरणामुळे परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जात होती. यावेळी पोलिस कर्मचारीदेखील उपस्थित होते. यामुळे काही काळ वातावरण तंग बनले होते.सायंकाळी उशिरा ठाकरे सेनेचे आमदार वैभव नाईक व पदाधिकारी देवगडमध्ये दाखल झाले होते, तर जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनीही देवगडला भेट दिली. आतापर्यंतच्या देवगडच्या इतिहासामध्ये पक्षांमध्ये समोरासमोर धक्काबुक्की व मारामारी होण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. या घटनेमुळे शांततेमध्ये असलेले देवगड अशांत बनले आहे.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्ण सल्लागार समितीची बैठक सोमवार ३ वाजता नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आली होती. याचवेळी शिवसेनेचे युवा तालुकाप्रमुख गणेश गावकर, नगरसेवक बुवा तारी, संतोष तारी, तालुकाप्रमुख जयेश नर, संतोष दळवी, हर्षा ठाकुर, काँग्रेसचे तालुकाप्रमुख उमेश कुळकर्णी, उल्हास मणचेकर व महाविकास आघाडीचे काही कार्यकर्ते ग्रामीण रुग्णालय देवगडमध्ये या समितीच्या बैठकीमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक व देवगड ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक यांना समस्यांबाबत जाब विचारण्यासाठी आले होते.

ग्रामीण रुग्णालयातच वादावादी

ग्रामीण रुग्णालयामधील रुग्ण सल्लागार समितीची बैठक संपवून आमदार नितेश राणे बाहेर येत असतानाच त्यांच्यासोबत भाजपा कार्यकर्तेदेखील उपस्थित होते. यावेळी उबाठा सेनेच्या व भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आमदार नितेश राणे यांच्यासमोरच शाब्दिक चकमक झाली. याचे रूपांतर मारामारीतही झाले. दोन पक्षांमध्ये झालेल्या या वादावादीमुळे ग्रामीण रुग्णालयातील वातावरण तणावाचे झाले होते.

मी विरोधी पक्षाचाही आमदार, प्रश्न विचारा

आमदार नितेश राणे म्हणाले, विरोधी पक्षाचे कार्यकर्ते असले तरीदेखील मी त्यांचा आमदार आहे. काय प्रश्न असतील तर ते मला सांगा मी ते सोडविण्याचा प्रयत्न करतो. मात्र, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावरती धावून जात होते. पोलिसांसमोर या झालेल्या प्रकारामुळे शांतमय असलेले देवगड अशांततामय झाले आहे.

राजकीय मारामारी करून प्रश्न सुटणार काय?

गेली काही दिवस देवगड ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांबाबत शिवसेना उबाठा सेनेच्यावतीने निवेदन देण्याचे व जाब विचारण्याचे प्रकार चालू होते. याचे अखेर पडसाद भाजपा व उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाल्यामुळे देवगड तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये रुग्णालयातील समस्या सोडविण्याबाबत राजकीय लोकप्रतिनिधींनी केलेल्या कृत्याबाबत नाराजी होती. मारामारी करून रुग्ण समस्या सोडविल्या जातील का ? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Devgad Police Stationदेवगड पोलिस स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग