शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

बंदर जेटीवर व्यवसाय करण्यास ‘तात्पुरती’ परवानगी

By admin | Updated: September 20, 2016 00:06 IST

भाजपने घेतली बंदर निरीक्षकांची भेट : स्टॉलधारकांसाठी लवकरच पार्किंग जागेत दुकानगाळे

मालवण : येथील बंदर जेटी येथे बंदर विभागाच्या जागेत गेली काही वर्षे स्थानिकांकडून पर्यटन व्यवसाय होत आहे. स्थानिकांनी स्वत:च्या हिमतीवर व्यवसाय सुरू केले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बंदर विभागाकडून अन्याय न होऊ देता कायमस्वरूपी दुकान गाळ्यांची व्यवस्था करण्यात यावी. बंदर विभागाने स्थानिक व्यावसायिकांशी समन्वय साधून त्यांना दुकान गाळ्यांची उभारणी होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात बंदर जेटी येथील शेडमध्ये व्यवसाय करण्याची व्यवस्था आणि परवागनी द्यावी, अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांच्याकडे केली.स्टॉलधारकांसमवेत भाजपच्या शिष्टमंडळाने भेट घेत व्यावसायिकांवर अन्याय न होता तात्पुरती जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केल्यानंतर बंदर निरीक्षक पाटील यांनी बंदर विभागाच्या पार्किंग जागेत स्टॉलधारकांसाठी दुकानगाळे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याबाबतचा प्रस्तावही लवकरच वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल, असे स्पष्ट केले. तर व्यावसायिकांना व्यवसायाच्यादृष्टीने कायमस्वरूपी दुकानगाळे उभारण्यात येईपर्यंत बंदर जेटी येथील शेडमध्ये दुकाने थाटण्यास पाटील यांनी समर्थता दर्शविली आहे. मालवण भाजपच्या शिष्टमंडळाने बंदर निरीक्षक यांची सोमवारी भेट घेतली. यावेळी तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, शहर अध्यक्ष बबलू राऊत, बचतगट संयोजक पूजा सरकारे, हेमंत मोंडकर, दादा आचरेकर यांच्यासमवेत स्टॉलधारक व्यावसायिक उपस्थित होते. बंदर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही मालवण दौऱ्यावर असताना जेटी तसेच पार्किंगची पाहणी केली आहे. बंदर विभागाकडून तशा पद्धतीचा प्रशासकीय प्रस्ताव पाठविला गेल्यास मंत्रीमहोदय तत्काळ निधी उपलब्ध करून देतील, असे बाबा मोंडकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)स्थानिकांवर अन्याय होऊ नयेस्थानिक व्यावसायिक स्व कष्टाने पर्यटन क्षेत्रात उतरले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय न करता परप्रांतीय व्यवसायिकांना अभय देण्यात येऊ नये. स्थानिक स्टॉलधारकांना कायमस्वरूपी गाळे उपलब्ध करून देण्यासाठी बंदर विभागाकडून नियोजन करून याचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात यावा. याबाबत बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपकरून पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे मोंडकर म्हणाले. यावेळी स्टॉलधारकानींही समस्या मांडल्या. यावर बंदर निरीक्षकांनी जेटी येथील शेडमध्ये तात्पुरत्या स्वरुपात व्यवसाय करण्यासाठी समर्थता दर्शविली आहे.पार्किंग ‘इन-आऊट’ असावेपर्यटकांच्या गाड्या पार्किंगसाठी बंदर विभागाच्या माध्यमातून प्रशस्त पार्किंग व्यवस्था तयार करण्यात आली आहे. भविष्यात या पार्किंग जागेत एका बाजूने दुकानगाळे उभारले जाणार असल्याने व्यावसायिकांची विक्री व्हावी तसेच पर्यटकांना गाड्या पार्क करताना सुसूत्रता यावी यासाठी जुनी स्टेट बँक व हॉटेल सागर किनारा या दोन ठिकाणाहून इन-आऊट वाहतूक व्यवस्थेबाबत विचार व्हावा. जेणेकडून व्यवसायिकांना त्याचा फायदा होऊ शकेल, असेही मोंडकर यांनी सांगितले. किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची आम्ही शिवप्रेमी म्हणून सेवा देतो. बंदर विभागाची जागा असली तरी याचे रक्षण आम्ही करत आलो आहोत. त्यामुळे स्थानिकाना बंदर विभागाकडून सहकार्य मिळावे, असे दादा आचरेकर यांनी सांगितले.