शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मडुऱ्यात टेम्पोला अपघात; सुदैवाने चालक बचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 17:25 IST

बांदा-शिरोडा मार्गावरील मडुरा डिगवाडी नाबर स्कूलजवळ दुपारच्या सुमारास समोरून अचानक आलेल्या वाहनाला बाजू देताना टेम्पोला अपघात झाला. साईडपट्टीच्या धोकादायक कामामुळे अपघात झाल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. चालकाला किरकोळ दुखापत झाली असून वेळीच गाडीवर नियंत्रण मिळविल्याने हानी टळली.

ठळक मुद्देमडुऱ्यात टेम्पोला अपघात; सुदैवाने चालक बचावलावेळीच गाडीवर नियंत्रण मिळविल्याने हानी टळली

बांदा : बांदा-शिरोडा मार्गावरील मडुरा डिगवाडी नाबर स्कूलजवळ दुपारच्या सुमारास समोरून अचानक आलेल्या वाहनाला बाजू देताना टेम्पोला अपघात झाला. साईडपट्टीच्या धोकादायक कामामुळे अपघात झाल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. चालकाला किरकोळ दुखापत झाली असून वेळीच गाडीवर नियंत्रण मिळविल्याने हानी टळली.शिरोड्याहून बांद्याच्या दिशेने जाणारा मालवाहू छोटा टेम्पो मडुरा हनुमान मंदिराजवळील मोरीपुलाजवळ आला असता रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडीमुळे समोरून येणारे वाहन चालकाच्या अचानक दृष्टीस पडले. एका बाजूने साईडपट्टी धोकादायक असल्याने जीव वाचविण्यासाठी टेम्पो चालकाला गाडी झुडपांनी व्यापलेल्या गटारात न्यावी लागली.

टेम्पोच्या पुढे केवळ दहा फुटांच्या अंतरावर मोरीपुल राहिले. चालकाने वेळीच नियंत्रण मिळविल्याने चालक बालंबाल बचावला. अन्यथा टेम्पोसहीत चालक मोरीपुलात कोसळला असता. या घडलेल्या घटनेला सार्वजनिक बांधकाम विभाग सर्वस्वी जबाबदार असल्याचे संतप्त ग्रामस्थांनी सांगितले. दुपारी उशीरा ग्रामस्थांच्या सहकार्याने टेम्पो झुडपांतून बाहेर काढण्यात आला. तसेच शेर्ले ते कोंडुरा पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे हटविण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.बांधकामला जाग कधी येणार ? : वालावलकरपावसाळ्यात वाहनांना बाजू देण्यासाठी साईडपट्टी धोकादायक बनते, याची कल्पना बांधकाम विभागाला वारंवार देण्यात आली आहे. हनुमान मंदिराजवळील मोरीपुलाचे संरक्षक कठडे जीर्ण झाले असून झुडपांनी व्यापले आहेत. लहान अपघात झाला असून याची दखल सार्वजनिक बांधकाम विभाग घेणार काय? तसेच अजून किती अपघात झाल्यावर अधिकाऱ्यांना जाग येणार असा सवाल मडुरा उपसरपंच विजय वालावलकर यांनी केला आहे. 

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग