शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा वर्षात काय विकास केला तो जनतेला सांगा, राजन तेलींचे दीपक केसरकरांना खुले आव्हान

By अनंत खं.जाधव | Updated: July 22, 2024 17:59 IST

'हिम्मत असेल तर आमने-सामने या' 

सावंतवाडी : जिल्ह्याचा विकास करण्यासाठी संपत्ती विकणार अशी भाषा करणाऱ्या मंत्री दीपक केसरकर यांनी हिम्मत असेल तर चर्चासत्राच्या माध्यमातून आमने सामने यावे आणि पंधरा वर्षात जिल्हयाचे किंबहूना मतदारसंघाचे काय भलं केलं हे लोकांसमोर मांडावे असे खुले आव्हान माजी आमदार राजन तेली यांनी दिले. शिक्षण खात्यामध्ये निर्विदा न काढताच तब्बल ८० कोटी रुपयांची कामे वाटण्यात आली असून पुजा खेडेकर प्रकरणातही मंत्री केसरकर यांचा संबध असल्याचे वृत्त खासगी वाहिन्यावर प्रसारित करण्यात आले आहे असा दावा ही तेली यांनी केला.ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. तेली म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर नवनवीन घोषणा करायच्या हा जुनाच धंदा आहे. पंधरा वर्षांमध्ये केवळ येथील जनतेला फसवण्याचे काम केले आहे. पंचतारांकितच्या घोषणा केसरकर करत आहेत, परंतु स्वतःच्या घरासमोरील एसटी बस स्थानक साडेसात वर्ष होऊनही ते सुधारू शकले नाहीत ही शोकांतिका आहे. रेडी येथे सी वर्ल्ड प्रकल्पाबाबत ते बोलत आहेत तसेच पंचतारांकित ताज हॉटेलही दोन महिन्यात सुरु होणार असल्याचे ते म्हणत आहेत. या ठिकाणी उद्योग व्यवसाय यायलाच पाहिजे त्याबाबत आमचा विरोध नाही. परंतु उद्योग येताना स्थानिकांना तिकडून विस्थापित करू नये ही आमची भूमिका आहे. त्यामुळे उद्या तुम्ही कुठल्याही नेत्यांना बोलवा परंतु त्या नेत्यांनी आधी जनतेचे प्रश्न ऐकून घ्यावे लागतील अशी माझी विनंती आहे.पक्ष तिकीट देईल की नाही ही दूरची गोष्ट, परंतु..रेडी येथे कुठल्याही प्रकारची जमीन नसताना शेवटची घोषणा ते करत आहे.निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांचे हे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे गोड बोलून इथल्या जनतेची आणि तरुण पिढीची फसवणूक करण्याची संधी मी केसरकर यांना देणार नाही पक्ष मला तिकीट देईल की नाही ही दूरची गोष्ट आहे. परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये गावागावात जाऊन केसरकर यांच्या आश्वासनांचा त्यांनी केलेल्या घोषणांचा बुरखा मी फाडणार आहे.हिम्मत असेल तर आमने-सामने या मंत्री केसरकर प्रॉपर्टी विकण्याची भाषा पुन्हा एकदा करू लागले आहेत. परंतु गेल्या पंधरा वर्षात आमदारकी मंत्रीपद बघून ज्यांना काही करता आले नाही ते आता पुन्हा एकदा जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी सज्जनतेची भाषा करत आहेत. परंतु विकास बाजूला ठेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक तरी असा विकास सांगा की जो तुम्ही केलात आणि त्यातून तुम्ही इथल्या पाच-दहा तरुणांना रोजगार देऊ शकला. त्यामुळे हिम्मत असेल तर चर्चासत्राच्या माध्यमातून आमने सामने या असे आव्हानही तेली यांनी दिले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRajan Teliराजन तेली Deepak Kesarkarदीपक केसरकर