शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

भविष्यात भाजपमधून हकालपट्टी होणाऱ्या तेली यांनी राणें विषयी बोलू नये : सतीश सावंत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 16:43 IST

भाजप मधून भविष्यात हकालपट्टी होणाऱ्या राजन तेली यांनी नारायण राणें विषयी काही बोलू नये, असा टोला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रवक्ते तथा जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी लगावला आहे.

ठळक मुद्देभविष्यात भाजपमधून हकालपट्टी होणाऱ्या तेली यांनी राणें विषयी बोलू नये  कणकवली येथे पत्रकार परिषदेत सतीश सावंत यांचा टोला

कणकवली : स्वतःचा स्वाभिमान गहाण टाकलेल्या राजन तेली यांना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा हे सांगण्याचा अधिकार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना व भाजपची युती झाल्यास तेली बंडखोरी करून आमदारकी लढवतील. त्यामुळे भाजप मधून भविष्यात हकालपट्टी होणाऱ्या राजन तेली यांनी नारायण राणें विषयी काही बोलू नये, असा टोला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रवक्ते तथा जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी लगावला आहे.कणकवली येथील महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष संपर्क कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आनंद ठाकुर उपस्थित होते.सतीश सावंत पुढे म्हणाले, नारायण राणेंवर टिका करणाऱ्या राजन तेली यांनी आपले भाजप पक्षा मधील वय किती ते आधी सांगावे. सन 2014 मध्ये एका रात्रीत त्यांचा स्वाभिमान काय असतो ते जनतेने पाहिले आहे. त्यामुळे त्याना राणेंवर टिका करण्याचा नैतिक अधिकार नाही.

राज्यात तसेच देशात सध्या असलेल्या वस्तुस्थितिला धरूनच नारायण राणे बोलत आहेत. जनतेला होणारा त्रास ते आपल्या भाषणातून मांडत आहेत. त्यामुळे राणेना काही सांगायचेच असेल तर भाजप मधील वरिष्ठ काय ते सांगतील. त्याची काळजी तेली यानी करु नये.आमदारकीवर डोळा ठेवून राजन तेली यांनी टिका करण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवू नये. नारायण राणे यांनी 14 वर्षात काय केले ? असा प्रश्न राजन तेली विचारत आहेत. मात्र, या काळात त्यानी इतर काम काय केले यापेक्षा राजन तेली यानाच सर्वार्थाने प्रथम उभे करायचे काम केले एवढे मात्र निश्चित आहे. त्यामुळे केलेल्या उपकाराची जाण तेली यानी ठेवावी.आकारीपड, वनसंज्ञा असे प्रश्न राणेनी मार्गी लावले नसतील तर त्याला सर्वस्वी कारणीभूत राजन तेली आहेत. कारण त्याकाळी पाठपुरावा करण्याचे काम तेली करीत असत. कार्यकर्त्याना राणेपर्यन्त पोहोचू न देणे, अडचणी आणून विकासकामे ठप्प करणे हे काम तेली करीत असत. नारायण राणेनी नेमके काय केले हे जनतेला माहीत आहे. त्यामुळे तुम्ही जनतेसाठी काय केले ते सांगा.शिवसेना व भाजप युती झाली तर भविष्यात स्वतःचा विचार करून तेली आमदारकी लढवतील. तेली यांच्या जाण्यामुळे आमच्या पक्षाचे नुकसान काहीही झालेले नाही. याउलट फायदाच झाला. पण भाजप मधील अनेक पदाधिकारी त्यांच्यामुळे नाराज असून ते योग्य वेळी काय तो निर्णय घेतील. हे तेली यांनी लक्षात घ्यावे.असेही सतीश सावंत यावेळी म्हणाले.राणे सहयोगी पक्षाचे खासदार !नारायण राणे हे स्वाभिमान पक्षाचेच सदस्य असून ते भाजप सहयोगी पक्षाचे खासदार आहेत. याबाबत तेली यांना माहिती नसल्यास त्यांनी भाजपच्या वरिष्ठ सरचिटणीसांकडून ती करून घ्यावी. अलीकडेच महसुलमंत्री चंद्रकांत पाटील या मुद्यावर बोलले आहेत. त्यांच्याकडून माहिती घ्यावी. असेही सतीश सावंत यावेळी म्हणाले.

टॅग्स :Satish Sawantसतीश सावंतsindhudurgसिंधुदुर्गRajan Teliराजन तेली