शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांच्या कारभारामुळे सणासुदीत स्टॉल धारकांच्या डोळ्यात अश्रू, सतीश सावंत यांची टीका

By सुधीर राणे | Updated: March 21, 2023 17:32 IST

कणकवली : कणकवली येथील स्टॉलधारकांना विस्थापित करण्याचे काम सत्ताधारी आणि आमदार नितेश राणे यांनी केले आहे. वास्तविक गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला ...

कणकवली: कणकवली येथील स्टॉलधारकांना विस्थापित करण्याचे काम सत्ताधारी आणि आमदार नितेश राणे यांनी केले आहे. वास्तविक गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला स्टॉलधारकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येणे अपेक्षित होते. मात्र, या सत्ताधाऱ्यांच्या कारभारामुळे स्टॉल धारकांच्या डोळ्यात दुःखाश्रू आले आहेत अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी केली आहे.कणकवली येथील मध्यवर्ती कार्यालयात आज, मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, नगरसेवक कन्हैया पारकर, प्रमोद मसुरकर, विलास गुडेकर, सचिन आचरेकर उपस्थित होते.सतीश सावंत म्हणाले, चार वर्षापुर्वी बैठक घेत नितेश राणे यांनी कणकवली शहरातील स्टॉलधारकांना पर्यायी जागा देण्याचे आश्वासन दिले होते. यावेळी शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. मात्र, आता स्टॉल हटविण्यात आले. याबाबत आमदार नितेश राणे साधा ब्र पण काढत नाहीत. राणे यांनी ज्याप्रकारे इतर बाबतीत फसविण्याचे काम केले, तीच पद्धत येथेही केली. जर आता नगरपंचायत किंवा विधानसभेची निवडणूक असती तर ही स्टॉल हटाव मोहीम झालेच नसते. अशाचप्रकारे वैभववाडीमध्ये स्टॉलधारकांवर अन्याय करण्याचे काम करण्यात आले आहे.ग्लोबल असोसिएटसने  शहरातील भाजी मार्केटची इमारत तयार असल्याचे कळविले आहे.  त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने याबाबतची भूमिका जनतेसमोर जाहिर करावी. याबाबत प्रशासन निर्णय घेण्यास विलंब का करत आहे. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी याविषयात लक्ष घालून या स्टॉलधारकांवरील अन्याय दूर करावा. तसेच त्यांना हक्काची जागा द्यावी. १९९७ मध्ये अशाचप्रकारे स्टॉल हटविण्याचा मुद्दा आला. त्यावेळी पालकमंत्री असलेल्या नारायण राणे यांनी तातडीने हटाव मोहिम थांबविली होती. आता ते केंद्रीय मंत्री आहेत. तसेच आमदार, जिल्हाध्यक्ष यांच्या पक्षाची  सत्ता असतानाही त्यांच्याकडून जनतेला वेठीस धरले जात आहे.  

शहरासह अन्य भागात सध्या सुरू असलेली इतर कामेही दर्जाहीन आहेत. कामे दर्जेदार होण्यास या मंडळींना इंटरेस्ट नसल्याचे सांगतानाच बीबीएम रद्द करून बीएम करण्याचा निर्णय हा हॉटमिक्सवाल्यांच्या फायद्यासाठी घेण्यात आला आहे. कामे दर्जेदार न झाल्यास कार्यकारी अभियंता यांना  जाब विचारला जाईल.आमदार राणे सांगत असतील की आम्ही २२०० कोटीचा निधी आणला, तर त्यांनी त्या कामाचा कार्यारंभ आदेश दाखवावा. कारण यापूर्वी सुरू केलेले वॉटर स्पोर्ट्स व अन्य प्रकल्पांचे काय झाले? याची माहिती जनतेला आहे. त्यामुळे जनता आता त्यांच्या खोट्या आश्वासनाला भुलणार नाही असेही  सतीश सावंत म्हणाले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली