शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बदली प्रकरण पेटले, आंतरजिल्हा बदलीवरून नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 17:57 IST

प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्या कार्यपद्धतीबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी पर्यायी शिक्षक मिळेपर्यंत या बदली झालेल्या शिक्षकांना न सोडण्याचा ठराव घेण्यात आला.

ठळक मुद्देशिक्षक बदलीप्रकरण पेटले, आंतरजिल्हा बदलीवरून नाराजी नवीन शिक्षक मिळेपर्यंत उर्वरित शिक्षकांना न सोडण्याचा ठराव

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७६ प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर केवळ दोनच शिक्षक या बदलीत जिल्ह्याला मिळणार आहेत. या बदलीचे आदेश ९ सप्टेंबर रोजी प्राप्त झाले असताना ११ सप्टेंबर रोजी यातील ४ शिक्षक कार्यमुक्त करण्यात आले. मात्र, याची साधी पूर्वकल्पना शिक्षण सभापतींना देण्यात आली नाही. त्यामुळे शिक्षण समिती सभेत सभापती डॉ. अनिशा दळवी यांच्यासह सभागृहाने तीव्र नाराजी व्यक्त केली. प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्या कार्यपद्धतीबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी पर्यायी शिक्षक मिळेपर्यंत या बदली झालेल्या शिक्षकांना न सोडण्याचा ठराव घेण्यात आला.जिल्हा परिषदेची शिक्षण समितीची तहकूब सभा येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात सभापती डॉ. अनिशा दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समिती सचिव तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, सदस्य सतीश सावंत, सरोज परब, सुनील म्हापणकर, राजेंद्र म्हापसेकर, राजन मुळीक, संपदा देसाई, उन्नती धुरी यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.आंतरजिल्हा बदलीचे शिक्षक सोडल्याने सतीश सावंत यांनी ह्यसभापतींनाच माहिती नसेल तर कसे चालेल ? असा प्रश्न उपस्थित करीत शिक्षक द्या, अन्यथा शाळा बंद करण्याचे आदेश द्या. केवळ नावाला शाळा सुरू ठेवू नकाह्ण असा ठराव घेऊन शासनाला पाठविण्याची सूचना केली. यावर सभापती डॉ. दळवी यांनीही ह्यमी ९ सप्टेंबर रोजी कार्यालयात आले. पुन्हा ११ रोजी आले होते. या दोन दिवसांत आंतरजिल्हा बदलीचे आदेश प्राप्त झाले.

या निर्णयाबाबत १० रोजी चर्चा झाली. ११ रोजी त्यावर मी येण्यापूर्वी अंतिम स्वाक्षरी झाली. त्यानंतर केवळ ही प्रक्रिया आपल्याला सांगितली गेली, असे सांगत नाराजी व्यक्त केली. शिक्षणाधिकारी आंबोकर यांनी अध्यक्षा संजना सावंत यांच्या दालनात त्यांच्यासमवेत उपाध्यक्ष रणजित देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी व आपल्यात चर्चा होऊन हजर झालेल्या ४ शिक्षकांच्या बदल्यात तेवढेच शिक्षक सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदTeacherशिक्षकsindhudurgसिंधुदुर्ग