शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

उमेद अभियान खासगी लोकांच्या घशात घालण्याचे काम:  राजन तेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 13:28 IST

rajanteli, sindhududrgnews उमेद अभियान खासगी लोकांच्या घशात घालण्याचे काम राज्य सरकारकडून केले जात आहे. सिंधुदुर्गनगरी येथे ५ हजार महिलांच्या मोर्चासमोर पालकमंत्री उदय सामंत यांनी मोठ्या वल्गना केल्या होत्या. मात्र, त्या फोल ठरल्या आहेत. ठाकरे सरकार नेमके कोणासाठी काम करीत आहे ? असा प्रश्न निर्माण होत आहे. दिलेली आश्वासने सरकारने पूर्ण केलेली नाहीत. याउलट विविध माध्यमातून जनतेची थट्टाच चालविली आहे, अशी टीका भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी केली.

ठळक मुद्देउमेद अभियान खासगी लोकांच्या घशात घालण्याचे कामसरकारकडून जनतेची थट्टा  :  राजन तेली

कणकवली : उमेद अभियान खासगी लोकांच्या घशात घालण्याचे काम राज्य सरकारकडून केले जात आहे. सिंधुदुर्गनगरी येथे ५ हजार महिलांच्या मोर्चासमोर पालकमंत्री उदय सामंत यांनी मोठ्या वल्गना केल्या होत्या. मात्र, त्या फोल ठरल्या आहेत. ठाकरे सरकार नेमके कोणासाठी काम करीत आहे ? असा प्रश्न निर्माण होत आहे. दिलेली आश्वासने सरकारने पूर्ण केलेली नाहीत. याउलट विविध माध्यमातून जनतेची थट्टाच चालविली आहे, अशी टीका भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी केली.कणकवली येथील भाजपाच्या कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजन तेली म्हणाले, भाजपाला बिहार निवडणुकीत खूप चांगले यश प्राप्त झाले आहे. बूथ अध्यक्ष यांना याचे श्रेय जाते. महाराष्ट्र सरकारने अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत. या मंडळाच्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळण्यासाठी काम केले जात होते. सरकारने मत्स्य पॅकेज जाहीर केले. पण त्या पॅकेजमध्ये एकालाच लाभ मिळणार आहे. मच्छिमार बांधवांचे संपूर्ण कुटूंब काम करीत असते. मात्र, पॅकेजमधून मदत मिळण्यासाठी जाचक अटी सरकारने घातल्या आहेत. त्या पूर्ण करता येणे शक्य नाही.पालकमंत्री, खासदार व शिवसेनेचे आमदार एकमेकांचे कौतुक करीत असतात. मात्र, जनतेच्या समस्या सुटत नाहीत. वाळू लिलाव झालेले नसताना कोल्हापूर व गोवा येथे जिल्ह्यातून शेकडो ट्रक जात आहेत. या चोरट्या वाळूच्या मागे कोण आहे? अधिकाऱ्यांशी हितसबंध कोणाचे आहेत ? गोवा येथून दारू जिल्ह्यात येतेच कशी ? याबाबत सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. तसे झाले नाही तर अवैध धंद्यांविरोधात दिवाळीनंतर भाजपा सर्व ताकदीनिशी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत प्रशासनाला जाब विचारेल, असा इशाराही राजन तेली यांनी यावेळी दिला.सिंधुदुर्गातील सर्वच निवडणुका जिंकणारजिल्हा बँक व ७१ ग्रामपंचायती, ५० टक्के विकास संस्था, दोन नगरपंचायती यांच्या निवडणुका भाजपा स्वबळावर लढणार आहे. उर्वरित पक्ष एकत्र आले तरी भाजपावर व खासदार नारायण राणे, माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर जनतेचा विश्वास असल्याचे राजन तेली यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Rajan Teliराजन तेली sindhudurgसिंधुदुर्ग