शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तारकर्ली निष्कलंक रहायला हवी - मधु मंगेश कर्णिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 15:41 IST

पर्यटनाच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केलेले तारकर्ली गाव झपाट्याने प्रगती साधत आहे. यात अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत

 

मालवण : पर्यटनाच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केलेले तारकर्ली गाव झपाट्याने प्रगती साधत आहे. यात अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून घडणाºया वाईट गोष्टींना गावात थारा असता कामा नये. तारकर्ली आज जशी निष्कलंक आहे तशीच ती कायम रहायला हवी, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी लिहिलेल्या ‘तारकर्ली’ या कादंबरीचा प्रकाशन सोहळा रविवारी सायंकाळी तारकर्ली महापुरुष मंदिर येथे मोठ्या थाटात झाला. यावेळी व्यासपीठावर गंगाराम गवाणकर, महेश केळुसकर, वैशाली पंडित, रूजारिओ पिंटो, शशिकांत तिरोडकर, मंगेश मस्के, डॉ. जितेंद्र केरकर, स्नेहा केरकर, अनंत कोळंबकर, दादा कोळंबकर, नमिता कीर, रमेश कीर, अरुण नेरकर, महेंद्र पराडकर आदी उपस्थित होते.

यावेळी वस्त्रहरणकार गवाणकर म्हणाले, ज्या तारकर्ली गावच्या नावाने ही कादंबरी आहे त्याच तारकर्ली गावात कादंबरीचे प्रकाशन होत आहे. ही अत्यंत चांगली बाब आहे. यावेळी त्यांनी ‘अच्छी मच्छी’ ही विविध मासळीची ओळख करून देणारी कविता सादर करत उपस्थितांची वाहवा मिळविली. सूत्रसंचालन शशिकांत तिरोडकर यांनी केले. मंगेश मस्के यांनी आभार मानले. तारकर्लीची अवस्था गोव्यातील कलंगुट बिचसारखी होता कामा नयेयावेळी कर्णिक म्हणाले, तारकर्ली गावाची स्थित्यंतरे या नव्या कादंबरीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पूर्वीची तारकर्ली ही गरीब होती. परंतु आताच्या तारकर्लीत फार बदल झाल्याचे दिसून येते. कादंबरी वाचताना वाचकाला काल्पनिक तसेच वास्तववादी वाटेल. 

वाचकाने कादंबरीतील वास्तवाचा शोध घेण्याचा प्रयत्न करू नये. या कादंबरीत समाजवाद नाही. पण समाजाचा आविष्कार आहे आणि तो वाचकाला जाणवेल. तारकर्लीत पर्यटनाच्या माध्यमातून चांगले बदल होत आहेत. परंतु तारकर्लीची अवस्था गोव्यातील कलंगुट बिचसारखी होता कामा नये. 

मात्र, असे होणार नाही याची जबाबदारी तारकर्लीतील ग्रामस्थांनी घ्यायला हवी. कादंबरी लिहीत असताना ज्ञानेश देऊलकर, रूजारिओ पिंटो, महेंद्र पराडकर यांची मोलाची मदत झाली आहे. त्यामुळे त्यांची आठवण आज काढणे आवश्यक असल्याचे मत मधु मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केले.

तारकर्ली येथील महापुरुष मंदिरात ‘तारकर्ली’ कादंबरीच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात लेखक मधु मंगेश कर्णिक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गंगाराम गवाणकर, महेश केळुसकर, वैशाली पंडित, डॉ. जितेंद्र केरकर, स्नेहा केरकर आदी उपस्थित होते.