शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

तळवडे ग्रामपंचायतीसमोर अशोक राऊळ यांचे उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 12:34 IST

तळवडे ग्रामपंचायत दप्तरी वडिलोपार्जित घराची नोंद असताना प्रत्यक्षात मात्र त्या जागेवर घर दिसत नसल्याने या अजब कारभाराचा घर हरवले आहे अशा शब्दात निषेध करीत मळगाव-ब्राम्हणपाट येथील अशोक शत्रुघ्न राऊळ यांनी ग्रामपंचायतीसमोर उपोषण सुरू केले आहे. ग्रामपंचायत दप्तरी नोंद असलेले घर गायब कसे झाले, याचा खुलासा ग्रामपंचायतीने द्यावा, अशी राऊळ यांची मागणी आहे.

ठळक मुद्देघर गायब कसे झाले, याचा खुलासा ग्रामपंचायतीने द्यावाअशोक राऊळ यांचे उपोषण सुरू

तळवडे : ग्रामपंचायत दप्तरी वडिलोपार्जित घराची नोंद असताना प्रत्यक्षात मात्र त्या जागेवर घर दिसत नसल्याने या अजब कारभाराचा घर हरवले आहे अशा शब्दात निषेध करीत मळगाव-ब्राम्हणपाट येथील अशोक शत्रुघ्न राऊळ यांनी ग्रामपंचायतीसमोर उपोषण सुरू केले आहे. ग्रामपंचायत दप्तरी नोंद असलेले घर गायब कसे झाले, याचा खुलासा ग्रामपंचायतीने द्यावा, अशी राऊळ यांची मागणी आहे.याबाबत राऊळ यांनी सांगितले की, माझे वडील शत्रुघ्न राऊळ यांच्या नावावर इमारत क्र. ३५९ ही घराची मालमत्ता होती. पण सद्यस्थितीत ती मालमत्ता गायब होऊन त्या ठिकाणी दुसरीच इमारत कशी काय उभी राहिली? त्याच ठिकाणी आपला भाऊ महादेव राऊळ यांनी इमारत उभारली असून, एकाच जागेवर दोन इमारत नंबर दिसत आहेत. यामागचे गौडबंगाल काय? याचा खुलासा ग्रामपंचायतीने करावा.

या मागणीसाठी आपण वारंवार उपोषणे केली. मात्र अद्यापही न्याय न मिळाल्याने आमरण उपोषण सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. जोपर्यंत ग्रामपंचायतीकडून खुलासा मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा इशाराही राऊळ यांनी दिला.याबाबत न्याय मिळण्यासाठी राऊळ यांनी २६ जानेवारी रोजीही उपोषण केले होते. मात्र यावर तोडगा काढण्याच्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण स्थगित केले होते. मळगाव ग्रामपंचायत अंतर्गत पेटलेल्या या वादात आतापर्यंत पंचायत समिती सभापती पंकज पेडणेकर, गटविकास अधिकारी गजानन भोसले आदींनी मध्यस्थी केली, मात्र अद्यापही हा वाद मिटत नसल्याने उपोषणकर्ते अशोक राऊळ आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

अशोक राऊळ यांच्याबरोबर त्यांचे कुटुंबीयही उपोषणास बसले असून, मळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गुरूनाथ गावकर, माजी सरपंच निलेश राऊळ, हनुमंत पेडणेकर, माजी कामगार अधिकारी शेखर पाडगावकर व ग्रामस्थांनी या उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान, यासंदर्भात सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर यांच्याशी संपर्क साधला असता राऊळ यांच्या घराविषयी नियमाप्रमाणे कार्यवाही केल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग