शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

चिपी विमानतळासंदर्भात पुन्हा आढावा बैठक घ्या, मुख्यमंत्री ठाकरे यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 21:22 IST

Chipi airport Sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळासंदर्भातल्या सर्व त्रुटी १० फेब्रुवारी पर्यंत दूर करण्याचे आदेश आयआरबीच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच या विमानतळासंदर्भात त्रुटी दूर करून पुन्हा आढावा बैठक घेण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

ठळक मुद्दे१० फेब्रुवारी रोजी आढावा बैठक घ्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश वैभव नाईक यांची माहिती

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळासंदर्भातल्या सर्व त्रुटी १० फेब्रुवारी पर्यंत दूर करण्याचे आदेश आयआरबीच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच या विमानतळासंदर्भात त्रुटी दूर करून पुन्हा आढावा बैठक घेण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.चिपी विमानतळा संदर्भात आढावा बैठक मंगळवारी मुंबई येथे सह्याद्री अथितीगृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्याचे मुख्य सचिव, उद्योग विभागाचे सचिव, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव, आयआरबीचे प्रमुख अधिकारी व विविध खात्याचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत दिल्ली येथील डिजीसीए समितीने चिपी विमानतळाची पाहणी केल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने ज्या त्रुटी काढल्या आहेत, त्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यातल्या बहुतांशी त्रुटी दूर केल्या असल्याचे आयआरबीच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. उर्वरीत त्रुटी देखील पूर्ण करण्याची ग्वाही आयआरबीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व त्रुटी १० फेब्रुवारीपर्यंत दूर करण्याचे आदेश आयआरबीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचप्रमाणे पुन्हा आढावा बैठक त्याच दिवशी घेण्याचे आदेशही दिले आहेत. असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.

टॅग्स :Chipi airportचिपी विमानतळsindhudurgसिंधुदुर्ग