शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

योग्य खबरदारी घ्या

By admin | Updated: July 30, 2014 22:59 IST

प्रवीण सौदाणे : वेंगुर्लेत शोध, बचाव कार्यशाळा

वेंगुर्ले : देश विघातक कृत्ये करणारे सर्रासपणे समुद्री जलमार्गाचा वापर करून किनारपट्टीमार्गे प्रवेश करतात. यापूर्वी घडलेल्या घटनांत ते दिसून आले आहे. सागराशी नियमित संपर्कात असलेला मच्छीमार हा नेहमीच शासनास सहकार्य करतो. अनोळख्या व्यक्ती, त्यांच्या संशयास्पद हालचाली, संशयास्पद वस्तू, संशयास्पद वाहन याबाबत मच्छिमारांनी सतर्कता बाळगून नजीकच्या पोलीस ठाण्यात त्याची माहिती द्यावी. देशाची सागरी सुरक्षा अबाधित राखण्यास सहकार्य करावे, असे प्रतिपादन नौदलाचे कॅप्टन प्रवीण सौदाणे यांनी वेंगुर्लेत आयोजित कार्यशाळेत केले. मत्स्य व्यवसाय विभाग वेंगुर्ले व वेंगुर्ले मच्छिमार सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने येथील स्वामिनी मंगल कार्यालयात भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरी यांचे मच्छिमारांसाठी शोध व बचाव कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होत. या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून कॅप्टन प्रवीण सौदाणे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर नौदलाचे उत्तम नाविक, मनोज थापा, अश्विन खेडेकर, वेंगुर्ले कस्टम निरीक्षक संजीवकुमार, सहाय्यक मत्स्यविकास अधिकारी विजय कांबळे, बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर, वेंगुर्ले मच्छिमार सहकारी संस्थेचे चेअरमन वसंत तांडेल, पोलीस हेड कॉन्स्टेबल एकनाथ मुसळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नौदलाच्या अधिकाऱ्यांनी तसेच कस्टमच्या अधिकाऱ्यांनी किनारपट्टी व समुद्रातील घडामोडी, अनोळखी व्यक्ती व त्यांचा वापर याविषयी वेळोवेळी शासनाच्या यंत्रणेस क ळवून देशाची सुरक्षा वाढवा, असे आवाहन केले. यावेळी मच्छिमारप्रमुख प्रतिनिधी बाबी रेडकर, गणपत चोडणकर, पुुंडलिक केळूसकर, जनार्दन खडपकर, मोहन कोचरेकर, भरत पेडणेकर, सद्गुरू मलबारी यासह सागरी सुरक्षा रक्षक व मच्छिमार उपस्थित होते. (प्रतिनिधी)