नागपूर: सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकण किनारपट्टीवरील परप्रांंतिय ट्रॉलर्सकडून मोठ्या प्रमाणावर मासळीची लूट केली जाते. त्यामुळे स्थानिक मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. परप्रांंतिय ट्रॉलर्सकडून होणारे हे अतिक्रमण थांबवून वर्षानुवर्षे परप्रांतीय आणि स्थानिक मच्छिमारांतील या वादाला पूर्णविराम द्यावा, अशी मागणी कुडाळचे आमदार नीलेश राणे यांनी औचित्याच्या मुद्यातून मांडत सभागृहाचे लक्ष वेधले.आज हिवाळी अधिवेशनादरम्यान कुडाळ मालवण विधानसभेचे आमदार निलेश राणे यांनी गेली अनेक वर्षे कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारांचा अत्यंत ज्वलंत प्रश्न असलेला मलपी बोटींच्या आक्रमणाचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. यात बाजूच्या कर्नाटक राज्यातून येणारे ट्रॉलर्स कश्याप्रकारे आमच्या कोकण किनारपट्टीवरील स्थानिक मच्छीमारांना त्रास देतात याची माहिती सभागृहात देत परराज्यातील ट्रॉलर्सच्या बंदोबस्तासाठी समुद्रातील गस्त वाढविण्यासोबत मच्छीमारांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर गंभीर दखल घेण्याची विनंती केली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण गंभीर प्रश्न मांडला असून त्याची दखल देत याच्यावर योग्य कारवाई करणार असल्याची माहिती दिली.
Winter Session Maharashtra: कोकण किनारपट्टीवरील परप्रांतिय ट्रॉलर्सवर कारवाई करा, नीलेश राणेंनी वेधले सभागृहाचे लक्ष
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: December 17, 2024 13:09 IST