शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

विनायक राऊत यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 16:42 IST

Bjp sawantwadi sindhudurgnews -माजी खासदार नीलेश राणे यांनी खासदार विनायक राऊत यांना कुठेही मिळाल्यावर फटकावू असे म्हणताच त्याला आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिले. त्यानंतर शिवसेना-भाजपमधील वाद चांगलाच वाढत गेला असून, शुक्रवारी शिवसेनेने नीलेश राणे यांचा पुतळा जाळला; तर त्याला प्रत्युत्तर म्हणून सावंतवाडीत नगराध्यक्ष संजू परब यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार विनायक राऊत यांचा पुतळा जाळून त्याला चप्पल मार आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सालईवाडा परिसरात करण्यात आले.

ठळक मुद्देविनायक राऊत यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला सावंतवाडीत भाजपकडून आंदोलन

सावंतवाडी : माजी खासदार नीलेश राणे यांनी खासदार विनायक राऊत यांना कुठेही मिळाल्यावर फटकावू असे म्हणताच त्याला आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिले. त्यानंतर शिवसेना-भाजपमधील वाद चांगलाच वाढत गेला असून, शुक्रवारी शिवसेनेने नीलेश राणे यांचा पुतळा जाळला; तर त्याला प्रत्युत्तर म्हणून सावंतवाडीत नगराध्यक्ष संजू परब यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार विनायक राऊत यांचा पुतळा जाळून त्याला चप्पल मार आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सालईवाडा परिसरात करण्यात आले.यामध्ये नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक आनंद नेवगी, सुधीर आडिवरेकर, महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, दिलीप भालेकर, बांदा सरपंच अक्रम खान, नगरसेविका दीपाली भालेकर, परिणिती वर्तक, बंटी पुरोहित, सभापती मीनल धुरी आदी सहभागी झाले होते.गेले चार दिवस शिवसेना-भाजपमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे. त्याचा दुसरा अंक शुक्रवारी जिल्ह्यात पाहायला मिळाला. ओरोस येथे माजी खासदार नीलेश राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करीत आंदोलन केल्याचे ताजे असतानाच सावंतवाडीत खासदार विनायक राऊत यांंच्या पुतळ्याचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी स्वत: हातात चप्पल घेऊन राऊत यांंच्या पुतळ्याला जोडे मार आंदोलन केले. भाजपने अचानक आंदोलन केल्याने पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली होती. घटनास्थळी पोलीस मात्र दिसले नाहीत. या आंदोलनानंतर पोलिसांनी शहरात नाकाबंदी केली होती. 

टॅग्स :BJPभाजपाVinayak Rautविनायक राऊत SawantwadiसावंतवाडीMember of parliamentखासदारsindhudurgसिंधुदुर्ग