शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

नाधवडेतील देवलकर दाम्पत्याच्या घराची 'स्वप्नपूर्ती', 56 दिवसांत 'निर्धार' गेला 'पूर्णत्वास'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 22:28 IST

प्लास्टिकने झाकलेल्या नळ्याच्या झोपड्यातून हक्काच्या पक्क्या जाण्याचे नाधवडेतील वृद्ध देवलकर दाम्पत्याने आयुष्यभर पाहिलेले स्वप्न अखेर नववर्षाच्या प्रारंभी पूर्णत्वास गेले आहे.

वैभववाडी: प्लास्टिकने झाकलेल्या नळ्याच्या झोपड्यातून हक्काच्या पक्क्या जाण्याचे नाधवडेतील वृद्ध देवलकर दाम्पत्याने आयुष्यभर पाहिलेले स्वप्न अखेर नववर्षाच्या प्रारंभी पूर्णत्वास गेले आहे. वैभववाडीतील दत्तकृपा प्रतिष्ठानने पुढाकार घेत दिवाळी दिवशी दोन महिन्यात या दाम्पत्यासाठी घर उभारण्याचा केलेला निर्धार यानिमित्ताने पूर्णत्वास गेला आहे. गुरुवारी देवलकर दाम्पत्याचा 'स्वप्नपूर्ती' वास्तूत थाटात गृहप्रवेश झाला. यावेळी अनेकांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या.नाधवडे ब्राह्मणदेववाडी येथील रामचंद्र भिकाजी देवलकर व पत्नी सीताबाई सत्तरीत पोहोचलेले दाम्पत्य! त्यातही रामचंद्र हे प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त. पालन-पोषण करणारे तसे जवळचे कोणी नाही. आणि रहायला नीट घरही नाही. या दाम्पत्याची ही अवस्था दत्तकृपा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या कानावर गेली. त्यामुळे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते 8 नोव्हेंबरला दिवाळीनिमित्त देवलकर दाम्पत्याकडे गेले. त्यांच्या झोपडीवजा घरात जीव मुठीत घेऊनच वाकून प्रवेश करताना प्रत्येकाच्या मनात प्रश्नांचे काहूर माजलेले. आपण कोण म्हणून सांगावे? काय सांगावे आणि का आलो हे कसे सांगावे. काहीच सुचत नव्हते.      नाधवडेचे सुपुत्र आणि जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे ओळख करून दिल्यावर रामचंद्र देवलकरांना 'हुंदका' आवरला नाही. चहुबाजूंनी लाकडाचे ठेंगारे देऊन प्लास्टिकने अच्छादलेले कधीही कोसळण्याच्या शक्यतेत असलेल्या त्यांच्या घराच्या छप्पराकडे पाहिल्यावर सारेच सुन्न झाले. त्याचक्षणी देवलकर दांम्पत्याचे पक्क्या घराचे स्वप्न पुर्ण त्यांच्या डोक्यावरील 'संकट' दूर करण्याचा निर्धार प्रतिष्ठानने केला. 15 नोव्हेंबरला दत्तकृपा प्रतिष्ठानने पुढाकार घेऊन देेेेवलकरांंच्या पक्क्या घराच्या कामाचा शुभांरभ केला.स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्यातून देवलकर दांम्पत्याचे पक्के घर चाळीस दिवसांत उभे राहिले. त्यामुळे गृहप्रवेशाची लगबग सुरु झाली. गेल्या दोन तीन दिवसांपासून प्रत्येकजण आपल्याच घरचा कार्यक्रम समजून नियोजनात गुंतून गेल्याचे चित्र नजरेस पडत होते. सगळीकडे आंनदाचे वातावरण होते. देवलकर दाम्पत्य अक्षरक्षः भारावून गेले होते. गणेश पुजन झाले. महाप्रसाद झाला. सीताबाई देवलकर यांची धावपळ सुरु होती. तर बसल्याजागी रामचंद्र देवलकर यांचे डोळे मात्र आनंदाश्रूंनी सतत गडबडल्याचे दिसत होते.देवलकर दाम्पत्याच्या हक्काच्या पक्क्या घराची स्वप्नपूर्ती झाली. त्यानिमीत्ताने  सभातपी लक्ष्मण रावराणे, भैरी भवानी पतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, माजी उपसभापती दिगबंर मांजरेकर, नगरसेवक संतोष माईणकर, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष राकेश कुडतरकर,  बाबा कोकाटे, कवी मधुसुदन नानीवडेकर, संजय खानविलकर, शासकीय अधिकारी व कर्मचा-यांसह अनेकांनी देवलकर दांम्पत्याची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.'स्वप्नपुर्ती'साठी अनेकांचे योगदानस्वतःचे पक्के घर असावे. हे रामचंद्र देवलकर व सीताबाई या वृद्ध निराधार दाम्पत्याचे स्वप्न होते. पण ते पुर्ण होईल असा आशेचा किरण त्यांना दिसत नव्हता. दत्तकृपा प्रतिष्ठानच्या पुढाकाराने त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. त्याचा आनंद देवलकर दाम्पत्यांच्या चेहऱ्यांवर आनंद दिसला. त्यामुळेच प्रतिष्ठानने त्यांच्या घराला 'स्वप्नपूर्ती' नाव दिले. प्रतिष्ठानच्या या कार्याला राजकीय, सामाजिक व्यक्ती, शासकीय कर्मचारी कामगार तसेच अनेक दानशुर व्यक्ती आणि स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.