शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

मालवणात स्वच्छ भारत मिशनचे वाजले तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 12:27 IST

Malvan Sindhudurgnews- मालवण शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. घरोघरी कचरा उचलणाऱ्या ढकलगाड्यांसह कचरा वाहतूक करणारी वाहनेही नादुरुस्त बनल्याने शहरात कचऱ्याचे ढीग जागोजागी दिसून येत आहेत. त्यामुळे स्वच्छ भारत मिशनचे तीनतेरा वाजल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देमालवणात स्वच्छ भारत मिशनचे वाजले तीनतेराकचऱ्याची समस्या गंभीर : ढकलगाड्या बंद, वाहतूक करणारी वाहनेही नादुरुस्त

मालवण : मालवण शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. घरोघरी कचरा उचलणाऱ्या ढकलगाड्यांसह कचरा वाहतूक करणारी वाहनेही नादुरुस्त बनल्याने शहरात कचऱ्याचे ढीग जागोजागी दिसून येत आहेत. त्यामुळे स्वच्छ भारत मिशनचे तीनतेरा वाजल्याचे दिसून येत आहे.दरम्यान, कचरा समस्येची गंभीर दखल नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी घेतली आहे. नादुरुस्त सर्व गाड्या तत्काळ दुरुस्त करून घ्या. शहरात सर्वत्र पाहणी करून ज्या ठिकाणी कचरा साचला आहे त्याची उचल स्वच्छता विभागाकडून तत्काळ करून घ्या, असे आदेश नगराध्यक्ष यांनी प्रशासनास दिले आहेत.मालवण शहरातील प्रत्येक प्रभागात एक याप्रमाणे १७ प्रभागांत ढकलगाड्या दर दिवशी फिरवून घरोघरी कचऱ्याची उचल केली जात होती. मात्र, १३ गाड्या बंद पडल्याने अनेक प्रभागात गेले काही दिवस कचरा उचलण्यासाठी गाडीच येत नसल्याची तक्रार आहे. याबाबत नागरिकांच्याही तक्रारी वाढत आहेत.घरोघरी उचल केलेला अथवा सार्वजनिक ठिकाणी असलेला कचरा वाहतूक करून डम्पिंग ग्राऊंड येथे नेण्यासाठी पालिकेने तीन वर्षांपूर्वी पाच नव्या गाड्या (छोटे टेम्पो) खरेदी केल्या. मात्र, या गाड्या गंजून, तुटून गेल्या आहेत. टायर फुटले आहेत. तीन गाड्या पालिका आवारात बंद स्थितीत आहेत. पालिका प्रशासनाच्या कारभारावर शिवसेना पदाधिकारी व सत्ताधारी नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. युवासेना शहरप्रमुख तथा नगरसेविका तृप्ती मयेकर यांचे पुत्र तपस्वी मयेकर यांनी सकाळी कचरा वाहतूक वाहने अडवली.मृत माकड दिवसभर रस्त्यावरवायरी-हिंदळेकर वाडा येथे एक माकड मृतावस्थेत रस्त्यावर पडले होते. याबाबत पालिका आरोग्य विभागाला सकाळी सूचना देऊनही सायंकाळपर्यंत त्या माकडाला उचलण्याची कार्यवाही झाली नाही. स्वच्छता-आरोग्य विभागाच्या अशा भोंगळ कारभारामुळे शहरात आरोग्य प्रश्न निर्माण होण्याची भीती तपस्वी मयेकर यांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानGarbage Disposal Issueकचरा प्रश्नMalvan beachमालवण समुद्र किनाराsindhudurgसिंधुदुर्ग