शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

सावंतवाडीत स्वाभिमान आक्रमक, बांधकाम विभागामध्ये घुसताना गेटवर अडवले, ४४ जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 01:05 IST

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने मुुदत देऊनही तहसीलदारांच्या इमारतीचे काम पूर्ण न झाल्याने सोमवारी सकाळी स्वाभिमानचे कार्यकर्ते अधिका-यांना काळे फासण्यासाठी जात असताना पोलिसांनी बांधकाम विभागाच्या गेटवरच पदाधिकारी व कार्यकर्ते यांना अडवून ताब्यात घेतले.

सावंतवाडी : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने मुुदत देऊनही तहसीलदारांच्या इमारतीचे काम पूर्ण न झाल्याने सोमवारी सकाळी स्वाभिमानचे कार्यकर्ते अधिका-यांना काळे फासण्यासाठी जात असताना पोलिसांनी बांधकाम विभागाच्या गेटवरच पदाधिकारी व कार्यकर्ते यांना अडवून ताब्यात घेतले. यावेळी स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली असून, पोलिसांनी स्वाभिमानच्या ४४ कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले.सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या बांधकामाचे काम गेले सात वर्षे सुरू आहे. अनेक वेळा आंदोलने झाली, मात्र याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. तहसीलदार इमारत पूर्ण न झाल्याने सध्याचे तहसीलदार कार्यालय हे भाड्याच्या इमारतीत आहे. शासनाला भाड्याचा बोजा पडत आहे.त्यामुळे महाराष्ट्र स्वाभिमानने सार्वजनिक बांधकाम विभागाला पंधरा दिवसांची मुदत दिली होती. या मुदतीत जर हे काम पूर्ण झाले नाही, तर बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना काळे फासू, असा इशारा दिला होता. त्याप्रमाणे सोमवारी स्वाभिमानची मासिक बैठक होती. या बैठकीनंतर कार्यकर्ते व पदाधिकारी श्रीराम वाचन मंदिर येथून चालत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयापर्यंत गेले. यावेळी पहिल्यापासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाहेर पोलिस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस फौजफाटा तैनात होता. मोर्चाने पदाधिकारी व कार्यकर्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेटवर आले.यात तालुकाध्यक्ष संजू परब, संदीप कुडतरकर, सभापती रवींद्र मडगावकर, नगरसेवक राजू बेग, सुधीर आडिवरेकर, महिला अध्यक्षा मोहिनी मडगावकर, बेला पिंटो, केतन आजगावकर, प्रसन्न गोंदवले, जावेद खतीब, ज्ञानेश्वर सावंत आदींना पोलिसांनी गेटवरच अडवले. यावेळी संदिप कुडतरकर यांनी आम्हाला गेटवर अडवण्याचे कारण काय? हा बिहार आहे का, असा सवाल केला. आम्ही फक्त तहसीलदार कार्यालयाचे काम एवढे दिवस का लांबले ते विचारण्यासाठी जात आहोत, असे सांगितले. मात्र पोलिसांनी तुम्हाला जाता येणार नाही. पाहिजे तर तुम्ही पाच जण जावा आणि चर्चा करा, असे सांगितले. मात्र स्वाभिमानचे नेते ऐकण्यास तयार नव्हते.यावेळी स्वाभिमानच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. पालकमंत्र्यांच्या विरोधात कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा घोषणांचा सूर होता. ही घोषणाबाजी काही काळ सुरूच होती. त्याच वेळी महिला कार्यकर्त्या पोलिसांसमोर आल्या. त्यांनी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी पोलिसांनी सर्वांना अडवले व पोलीस व्हॅनमध्ये बसवले.मात्र बराच वेळ कार्यकर्ते व पदाधिकारी व्हॅन बसण्यास तयार नव्हते. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून सर्वांना व्हॅनमध्ये बसवून पोलीस ठाण्यात नेले. यात स्वाभिमानचे पुरूष व महिला असे ४४ कार्यकर्ते होते. यात पदाधिकारी संदीप कुडतरकर, संजू परब, राजू बेग, सभापती रवींद्र मडगावकर, उपसभापती निकिता सावंत, महिला तालुकाध्यक्षा गीता परब, बेला पिंटो, नगरसेविका समृध्दी विर्नोडर, उत्कर्षा सासोलकर, दीपाली भालेकर, बेला पिंटो, चित्रा देसाई, पंचायत सदस्य संदीप नेमळेकर, जितू गावकर, जिल्हा परिषद सदस्य शेखर गावकर, दिलीप भालेकर आदींना पोलिसांनी ताब्यात घेत सोडून दिले.यावेळी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश जाधव, उपनिरीक्षक अरूण सावंत, लक्ष्मण गवस, कर्मचारी दाजी सावंत, विकी गवस, रामचंद्र मळगावकर, प्रमोद काळसेकर, संजय हुबे, मंगेश शिंगाडे, प्रमोद कांबळी, महिला पोलीस माया पवार यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.पोलिसांकडून दडपशाही : संजू परबआम्ही बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना सर्वसामान्यांच्या ज्वलंत प्रश्नावर भेटण्यासाठी गेलो होतो. तेथे कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्था हातात घेण्याचा विचार नव्हता. पण पोलिसांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सांगण्यानुसार दडपशाही करून आम्हाला ताब्यात घेतले. पण जोपर्यंत तहसीलदार कार्यालयाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा तालुकाध्यक्ष संजू परब यांनी दिला आहे.काम लवकरच पूर्ण करणार : देसाई बांधकाम विभागाने तहसीलदार कार्यालयाची इमारत लवकरात लवकर पूर्ण व्हावी, यासाठी सर्व प्रयत्न केले आहेत. स्वत: ठेकेदार सावंतवाडीत ठाण मांडून आहेत. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल. गणेश चतुर्थीपूर्वी काम पूर्ण करण्यााचे आमचे उद्दिष्ट आहे, असे मत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई यांनी स्पष्ट केले.ने  प्रति तास १०० रुपये भाडे वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीत या दरवाढीला मान्यता देण्यात आली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग