शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मांगवलीत पकडलेल्या जनावरांच्या ट्रकवरील कारवाईबाबत संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 16:59 IST

  जनावरांची भरदुपारी राजरोस वाहतूक करणारा ट्रक मांगवली तिठ्यावर ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला. त्या ट्रकमध्ये दहा बैल कोंबलेले होते. मात्र, घटनेला 24 तास उलटले तरी ट्रकवरील कारवाईबाबत पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे समोर येत आहे.

ठळक मुद्देट्रकवरील कारवाईबाबत पोलिसांची भूमिका संशयास्पद जनावरे कोपार्डेच्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे भासविण्याचा प्रयत्न ट्रक चालकाविरुद्ध बेकायदा वाहतुकीचा गुन्हा नोंदभुईबावडा घाटातून बैल, गायींची बेकायदा नियमित वाहतूक

वैभववाडी, दि. २१ :  जनावरांची भरदुपारी राजरोस वाहतूक करणारा ट्रक मांगवली तिठ्यावर ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला. त्या ट्रकमध्ये दहा बैल कोंबलेले होते. मात्र, घटनेला 24 तास उलटले तरी ट्रकवरील कारवाईबाबत पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे समोर येत आहे.

या प्रकरणात राजकीय व्यक्तींचा दबाव वाढल्यामुळे जनावरे तस्करीला व्यापाराचे गोंडस रुप देऊन पोलिसांनी गुन्ह्यातील हवा काढून टाकली आहे. राजकीय हस्तक्षेपानंतर पोलिसांनी केलेल्या चलाखीबाबत पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता वाढली आहे.

कोळपे वेंगसर, मांगवली मार्गे भुईबावडा घाटातून बैल आणि गायींची बेकायदा नियमित वाहतूक केली जाते. याबाबत पोलिसांना स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी कल्पना दिली आहे. मात्र, स्वतःहून पोलीस कारवाई करायला तयार नसल्याने ग्रामस्थांनीच पाळत ठेवून शुक्रवारी दुपारी 12.30 च्या सुमारास मांगवली तिठ्यावर जनावरांची वाहतूक करणारा ट्रक(एम.एच.09; सीए-8533) पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला.

ट्रकमध्ये 10 बैल होते. कोळपे येथून ती जनावरे कोल्हापूरकडे घेऊन जात होते. जनावरांचा ट्रक पकडल्याचे समजताच राजकीय पदाधिका-यांची फोनाफोनी सुरु झाली. तर काही थेट पोलीस ठाण्यात पोहोचले. ही कारवाई टाळण्यासाठी कत्तलखान्याकडे नेली जाणारी जनावरे कोपार्डेच्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे भासविण्याचा प्रयत्न अगदी शिताफीने केला गेला आहे. त्यामुळेच ट्रक चालकाविरुद्ध बेकायदा वाहतुकीचा गुन्हा नोंदवला आहे.

मात्र, वारंवार विचारणा करुनही ट्रकचालकचे नाव सांगण्यास पोलीस एकमेकांकडे बोट दाखवून टोलवाटोलवी करीत असल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे जनावरांच्या बेकायदा वाहतुकीला अभय देऊन दलालांना पाठीशी घालणा-या पोलिसांबाबत अवैध धंदेवाल्यांसाठी कर्दनकाळ ठरलेले पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम कोणते पाऊल उचलतात याची उत्सुकता आहे.

 

टॅग्स :Travelप्रवासPoliceपोलिस