शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

संशयिताचा जामीन अर्ज फेटाळला, गुन्हा गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 12:12 IST

बनावट शिक्के वापरून बनावट परवाना तयार केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या शहबाज आलम अब्दुल सलाम याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश २ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. रोटे यांंनी नामंजूर केला आहे.

ठळक मुद्देसंशयिताचा जामीन अर्ज फेटाळला, गुन्हा गंभीरबनावट शिक्के वापरून परवाना तयार केल्याचे प्रकरण

ओरोस : कोरोना प्रतिबंधात्मक कालावधीत इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या आधारे पोलीस अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के वापरून बनावट परवाना तयार केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या शहबाज आलम अब्दुल सलाम (२१, मूळ राहणार उत्तरप्रदेश, सध्या राहणार नालासोपारा) याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश २ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. रोटे यांंनी नामंजूर केला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनची स्थिती असताना परजिल्ह्यात किंवा परराज्यात चारचाकी वाहनाने परवानगीशिवाय जाण्या-येण्यास शासनाने प्रतिबंध केला होता. अत्यावश्यक सेवेतील वाहनांंव्यतिरिक्त अंत्यविधी व वैद्यकीय सेवा इत्यादी आपत्कालीन कारणांंसाठी नागरिकांना प्रवासी पास स्थानिक प्रशासनाकडून घेणे बंधनकारक करण्यात आले होते.दरम्यान, मुंंबईकर चाकरमान्यांंना गावी येण्यासाठी मुंबई पोलिसांच्या सही-शिक्क्यांचे बनावट पास बनवून देणाºया टोळीचा पर्दाफाश मुंंबई क्राईम ब्रँच आणि सिंधुदुर्ग पोलीस यांंच्या संयुक्त पथकाने केला होता. या प्रकरणी सर्फराज हसन शेख (३८), समीर शमशुद्दीन शेख (३६), नूर मोहम्मद शेख (३०, सर्व रा. हडी-मालवण) तसेच शहबाज आलम अब्दुल सलाम (२१) यांंच्यावर अनेक कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.यातील सर्फराज शेख याला २५ जुलै रोजी अटक झाली होती. पोलीस कोठडीनंतर त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. तर त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला होता. त्यामुळे सद्यस्थितीत तो न्यायालयीन कोठडीत आहे.

त्यानंतर शहबाज आलम अब्दुल सलाम या संशयिताला ३० जुलै रोजी अटक करण्यात आली होती. सद्यस्थितीत न्यायालयीन कोठडीत असलेल्या या संशयिताने जिल्हा व सत्र न्यायालयाकडे जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळून लावण्यात आला आहे.शहबाज याने बनावट पास बनवून दिल्याची बाब पोलीस तपासात निष्पण्ण झाली आहे. हे पास बनावट असल्याचा अभिप्राय बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त यांंनी दिला आहे. तसेच पास खरे आहेत हे भासविण्यासाठी त्याने बृहन्मुंबई पोलिसांच्या लोगोचा व ड्युटी कमिशनर पोलीस यांंच्या गोल शिक्क्याचा तसेच सहीचा गैरवापर केला असल्याची बाब समोर आली .त्यामुळे संशयिताने केलेला गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा आहे. शिवाय तो मूळचा उत्तरप्रदेश येथील राहणारा असल्याने पुन्हा मिळणे मुश्किल अशी शक्यता नाकारता येत नाही. अन्य दोन आरोपींंना अटक करणे बाकी आहे. त्यामुळे याला जामीन देण्यात येऊ नये अशी विनंती सरकार पक्षाकडून करण्यात आली होती अशी माहिती अ‍ॅड. तायशेटे यांंनी दिली. सरकार पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी अभियोक्ता संदेश तायशेटे यांंनी काम पाहिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग