शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुशांत नाईक व्यावसायिक हित पाहून सोयीस्कर भूमीका घेतात!, उपनगराध्यक्ष बंडू हर्णेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 14:13 IST

कणकवली : आमदार नितेश राणे यांनी नगरपंचायतीत भाजीविक्रेत्यांसाठी घेतलेल्या बैठकीवरुन शिवसेनेचे गटनेते सुशांत नाईक यांनी टीका केली होती. या ...

कणकवली : आमदार नितेश राणे यांनी नगरपंचायतीत भाजीविक्रेत्यांसाठी घेतलेल्या बैठकीवरुन शिवसेनेचे गटनेते सुशांत नाईक यांनी टीका केली होती. या टीकेला उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे प्रत्युत्तर दिले आहे. आमदार राणे यांच्यावर टीका करताना नगरसेवक सुशांत नाईकांनी स्वतः कणकवली शहरात नवीन प्रकल्पांना विरोध किती केला? त्याचा अभ्यास करावा. आमदार राणे हे नगरपंचायत व जनतेचे हित पाहून काम करतात. तर नाईक हे आपले व्यावसायिक हित पाहून सोयीस्कर भूमिका घेतात अशी टीका हर्णे यांनी केली आहे.     त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कणकवली शहरातील भाजी मार्केट होता नये याकरिता नगरपंचायतमध्ये पहिला हात वर करणारे सुशांत नाईक होते. नगरपंचायतची कचरा निविदा आपल्याला मिळवण्यासाठी नाईक यांनीच पैसे गुंतवले होते अशी चर्चा कणकवलीत होती. या कामाकरिता धुळ्याच्या ठेकेदार कंपनीला नाईक यांनी त्यांचे भाऊ आमदार वैभव नाईक यांच्यामार्फत कणकवलीत आणले होते. अशीही चर्चा आहे. आटोकाट प्रयत्न करून कचरा टेंडर त्यांनाच मिळाले होते. मग ते काम सुरू का केले नाही?कचऱ्याचा प्रश्न जटिल करून सत्ताधारी म्हणून आम्हाला अडचणीत आणण्याचा त्यांचा डाव फसला आहे. आपले पैसे गुंतवले हे नाव उघड झाल्यामुळे नाईक हे ऐनवेळी नेहमीप्रमाणे उघडे पडले. कचरा निविदेबाबत बोलणाऱ्या सुशांत नाईक यांनी आपल्या आमदार भावाला हाताशी धरून आणलेली धुळेची एजन्सी जर अधिकृत होती तर कार्यारंभ आदेश दिल्यानंतर त्या एजन्सीने काम का सुरू केले नाही? असा सवाल हर्णे यांनी केला.शहरात अनधिकृत बांधकामे करून शहरवासीयांची फसवणूक करण्याचे कामच सुशांत नाईक यांनी आतापर्यंत केले. पार्किंगमध्ये गाळे कोणी बांधले ते देखील वेळ आली तर आम्ही दाखवून देऊ शकतो. श्रीधर नाईक उद्यानासाठी ७५ लाख नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी मंजूर करून आणले. आपल्या वडिलांच्या नावाने असलेल्या उद्यानाला सुद्धा सुशांत नाईक यांना राज्यात सत्ता असून देखील निधी आणता आला नाही. आमदार वैभव नाईक नगरपरिषदेच्या कारभारात सर्वच ठिकाणी लक्ष देऊ लागल्याने तेथील तत्कालीन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी कंटाळून राजीनामा दिला. ही वस्तुस्थिती नाईक यांनी आपले भाऊ आमदार वैभव नाईक यांच्या कडून तपासून घ्यावी असा टोलाही हर्णे यांनी लगावला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग