शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: कुणकेश्वरमधील नव्या जागेचा सर्व्हे थंडावला, विरोधानंतर पर्यटन विभागाचा सावध पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 14:26 IST

संदीप बोडवे  मालवण: बहुचर्चित गुलदार प्रकल्पाची जागा बदलण्याचा घाट घातला जात असतानाच त्याला मालवण आणि आणि वेंगुर्ले मधून जोरदार ...

संदीप बोडवे मालवण: बहुचर्चित गुलदार प्रकल्पाची जागा बदलण्याचा घाट घातला जात असतानाच त्याला मालवण आणि आणि वेंगुर्ले मधून जोरदार विरोध होण्यास सुरुवात झाली आहे. या भागातून विरोधाची धार अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्यामुळे पर्यटन विभागानेही आता सावध पवित्रा घेण्यास सुरुवात केली आहे.निवती रॉक ऐवजी कुणकेश्वर समुद्रातील नव्या जागेच्या सर्व्हे बाबत महाराष्ट् मेरीटाइम बोर्ड आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा कडून हालचाली सुरू झाल्या होत्या. नागरिकांच्या विरोधानंतर आता या हालचाली थंडावल्याची माहिती मिळाली आहे. पर्यटन स्थळांचे जागतिक स्तरावर ब्रँडिंग आणि मार्केटिंग करण्याच्या उद्देशाने, भारत सरकारने 'भांडवल गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य (एसएएससीआय) या योजनेअंतर्गत २३ राज्यांमध्ये ४० प्रकल्पांना मंजुरी देताना एक्स आयएनएस गुलजार अंडरवॉटर म्युझियम आणि आर्टिफिशियल व पाणबुडी पर्यटन प्रकल्पासाठी ४६.९१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. एप्रिल अखेर ऐवजी आता २० मे ची डेडलाईन?...विजयदुर्ग बंदरात उभी असलेल्या एक्स आय एन एस गुलजार युद्धनौकेवरील समुद्री पर्यावरणाला घातक असलेले घटक काढून टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. पर्यावरणाला प्रदूषणकारी घटक काढून टाकल्यानंतर संबंधित विभागाकडून या प्रकल्पाला ना हरकत परवाना मिळणार आहे. त्याचप्रमाणे समुद्रतळाशी युद्धनौका स्थापित करण्यासाठी स्वतंत्र एजन्सी नेमण्यात येणार आहे.या कामांची व्याप्ती पाहता एप्रिल अखेर नंतर आता २० मे ची डेडलाईन निश्चित करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान जरी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने समुद्री हवामाना बाबत २० मे ची डेडलाईन सह निर्देश जारी केली असले तरीही १५ मे पूर्वी गुलदार प्रकल्प पूर्णत्वास नेण्यावर आमचा भर असेल असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले .

तर पर्यटन मंत्रालयाशी कराराचा भंगसध्याचा एमएमबी आणि एमटीडीसी चा दृष्टिकोन हा एमटीडीसी ने तयार केलेल्या आणि केंद्र सरकारला सादर केलेल्या अहवालाशी विसंगत आहे. हा अहवाल पर्यटन मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तयार करण्यात आला होता आणि त्यात निवती रॉक परिसराची निवड स्पष्टपणे नमूद आहे. कुणकेश्वर आणि १७ मीटर खोलीचा निर्णय कोणत्या आधारावर घेण्यात आला? यासाठी कोणतीही वैज्ञानिक अभ्यास सरकारच्या कोणत्याही संस्थेने केला आहे का? एमएमबी किंवा एमटीडीसी ने ठिकाण बदलण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाची परवानगी घेतली आहे का? जर नसेल, तर हा बदल अहवाल आणि पर्यटन मंत्रालयाशी केलेल्या कराराचा भंग ठरत नाही का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.

योग्य सन्मान राखला जावा..पावसाळी कालावधीत इंजिन नसलेली मोठी युद्धनौका विजयदुर्ग सारख्या लहान बंदरात उभी करून ती स्थिर ठेवणे कठीण आहे. समुद्राच्या लाटांचा प्रवाह, उधाणाची परिस्थिती विचारत घेता गुलदार पावसाळ्या पूर्वी समुद्र तळाशी स्थापित करणे आवश्यक आहे. गुलदार युद्धनौका निवृत्त झाली असली तरीही तिचा निवृत्ती पश्चात योग्य सन्मान राखला जावा अशा नौदलाच्या सूचना आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtourismपर्यटनindian navyभारतीय नौदल