शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मालवण शहरातील महाविद्यालयीन युवतीची आत्महत्या, अभ्यासाचे दडपण असल्याचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 17:09 IST

मालवण शहरातील गवंडीवाडा येथील प्राची रामदास चव्हाण (१९) या महाविद्यालयीन युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घराच्या वाशाला ओढणी बांधून गळफास घेतल्याचे रविवारी सकाळी ११.३० वाजता निदर्शनास आले. प्राची ही कुडाळ येथील संत राऊळ महाविद्यालयात माहिती तंत्रज्ञान शाखेत दुसऱ्या वर्षाला शिकत होती.

ठळक मुद्देअभ्यासाचे दडपण असल्याने तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज घराच्या वाशाला ओढणी बांधून गळफास

मालवण : शहरातील गवंडीवाडा येथील प्राची रामदास चव्हाण (१९) या महाविद्यालयीन युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घराच्या वाशाला ओढणी बांधून गळफास घेतल्याचे रविवारी सकाळी ११.३० वाजता निदर्शनास आले. प्राची ही कुडाळ येथील संत राऊळ महाविद्यालयात माहिती तंत्रज्ञान शाखेत दुसऱ्या वर्षाला शिकत होती.

शहरातील गवंडीवाडा येथे प्राची चव्हाण ही आपल्या कुटुंबीयांसमवेत रहायची. परीक्षा कालावधी सुरु असल्याने ती घराच्या एका खोलीत अभ्यासासाठी ११ वाजता गेली. त्या खोलीचा तिने दरवाजाही लावून घेतला.

मात्र अभ्यासासाठी गेलेली प्राची बराचवेळ खोलीबाहेर आली नाही. म्हणून तिच्या आईने खोलीचा दरवाजा उघडला असता प्राची घराच्या वाशाला ओढणीने बांधलेल्या अवस्थेत लटकताना दिसून आली.

आईने हंबरडा फोडल्यानंतर नातेवाईकांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्राची हिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. प्राची हिला अभ्यासाचे दडपण असल्याने तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केलाजात होता. याप्रकरणी अधिक तपास विवेक नागरगोजे हे करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस