शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच व्यवसायात परप्रांतीयांचा सुळसुळाट :उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 12:20 IST

राजकर्त्यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सामान्य जनतने याबाबत उठाव करणे गरजेचे आहे असे मत मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसर्वच व्यवसायात परप्रांतीयांचा सुळसुळाट : उपरकर निक युवक बेरोजगार : परशुराम उपरकर यांचे मत

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वच व्यवसायात परप्रांतीयांचा सुळसुळाट झाला आहे. परप्रांतीयांच्या या घुसखोरी धोरणामुळे जिल्ह्यातील तरुण व्यावसायिक हतबल झाले आहेत. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वारंवार निवेदने आणि पत्रव्यवहार करण्यात आला आहे. राजकर्त्यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सामान्य जनतने याबाबत उठाव करणे गरजेचे आहे असे मत मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी व्यक्त केले.कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी परशुराम उपरकर पुढे म्हणाले, कणकवली तालुक्यातील काही तरुण मोबाईल विक्रेते यांनी आपल्याला निवेदन देत आपली व्यथा मांडली आहे.

कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही परप्रांतीय मोबाईल व्यावसायिक ठाण मांडू पाहत आहेत. ग्राहकांना आमिषे दाखवून आपल्या दुकानाकडे आकर्षित करण्याचे काम हे व्यावसायिक करत आहेत. धनाडय परप्रांतीय व्यावसायिक स्थानिक व्यावसायिकांना त्यांचे व्यवसाय बंद करून आयुष्यातून उठवून पाहत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील मोबाईल व्यावसायिक अडचणीत आले आहेत.मोबाइल व्यवसायाव्यतिरिक्त कपडे, बिल्डिंग मटेरियल, हार्डवेअर,टेलरिंग व्यवसाय, केशकर्तनालय यांसारखे अनेक व्यवसाय परप्रांतीय करत आहेत. त्यामुळे स्थानिक व्यवसाय करणारे तरुण आणि व्यावसायिक हतबल झाले आहेत. आता मुंबईतील मराठी प्रमाणेच जिल्ह्यातील मालवणी माणसांचा टक्का कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत.

असेच चित्र राहिले तर काही दिवसात नोकरी किंवा कोणताही व्यवसाय नसल्यामुळे जिल्ह्यातील भावी पिढी वाममागार्ला जाण्याची भीती आहे. त्यामुळे या परप्रांतीय व्यावसायिकांना जिल्ह्यातील जनतेने आणि तरुणांनी हद्दपार करावे असे आवाहन आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करत आहोत असेही यावेळी उपरकर म्हणाले.सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष !परप्रांतीयांच्या होणाऱ्या आक्रमणाकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे स्थानिक युवक बेरोजगार होत आहेत. सिंधुदुर्गात येऊन परप्रांतीय आपली वस्ती वाढवत आहेत. तसेच आपली प्रार्थनास्थळेही उभारत आहेत. त्यांच्या अशा कृत्यामुळे भविष्यात स्थानिकांबरोबर तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे, असेही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्ग