शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सुधीर सावंत यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 11:28 IST

माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी अखेर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, महासचिव के. वेणूगोपाल, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, कोकण प्रभारी बी. संदीप, राजू वाघमारे आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देसुधीर सावंत यांचा काँग्रेसमध्ये प्रवेशदिल्लीत कार्यक्रम : खर्गेंसह राज्यातील नेत्यांकडून स्वागत

सावंतवाडी : माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी अखेर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, महासचिव के. वेणूगोपाल, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, कोकण प्रभारी बी. संदीप, राजू वाघमारे आदी उपस्थित होते.माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आल्यानंतर सुधीर सावंत आणि त्यांच्यात पक्षसंघटनेतून वाद झाले. यावेळी आपणास पक्षकार्यातून डावलण्यात येत असल्याचा आरोप करीत दहा वर्षांपूर्वी सावंत यांनी काँग्रेसपासून फारकत घेतली होती.त्यानंतर सावंत यांनी बसपा तसेच शिवराज्यपक्ष व अलीकडच्या काही वर्षांत आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. त्यांची महाराष्ट्राच्या समन्वयकपदी नेमणूक करण्यात आली होती.मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर देशातील काँग्रेसविरोधी वातावरण बघून सावंत यांनी पुन्हा स्वगृही परतण्याची इच्छा व्यक्त केली होती.

आता खरी काँग्रेसला आपली गरज असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळेच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मध्यस्थी करीत सावंत यांना काँग्रेसमध्ये प्रवेश मिळावा, असा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे धरला.त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा दिल्ली येथे काँग्रेस भवनाच्या बाहेर त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी खर्गे यांंनी सावंत यांचे पक्षात स्वागत केले. तसेच लवकरच त्यांच्यावर कोकणची महत्त्वाची जबाबदारी देण्याचे सूतोवाचही केले. प्रवेशाच्या कार्यक्रमाला दिल्लीसह राज्यातील नेत्यांनी उपस्थिती लावल्याने सावंत यांच्या प्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.सुधीर सावंत लवकरच जिल्ह्यातकाँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी खासदार सुधीर सावंत हे लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार असून, त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले जाणार आहे. त्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर यांनी सांगितले. सावंत येत्या दोन ते तीन दिवसांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत. 

टॅग्स :congressकाँग्रेसsindhudurgसिंधुदुर्गdelhiदिल्ली