शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

सुधा मूर्तींनी बापार्डे गावचं केलं कौतुक, 'KBC'तून मिळालेली रक्कम बापार्डे कॉलेजच्या उभारणीसाठी दिली होती

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: November 9, 2022 13:54 IST

बापार्डे ग्रामपंचायतीला भेट देत ग्रामपंचातीने राबविलेल्या विविध उपक्रमांची व पुरस्काराबाबत माहिती जाणून घेतली.

देवगड : प्रसिद्ध लेखिका पद्मश्री डॉक्टर सुधा मूर्ती यांनी 'कौन बनेगा करोडपती' या शोमध्ये भाग घेतला होता आणि या शो मधून मिळालेली सर्व रक्कम बापार्डे कॉलेजच्या उभारणीसाठी या शिक्षण संस्थेत देणगी स्वरूपात दिली होती. आज, बुधवारी बापार्डे येथील नव्याने उभारण्यात आलेल्या कॉलेजचे उद्घाटन पद्मश्री डॉ. सुधा मूर्ती यांच्या हस्ते होत आहे.या उद्घाटनाच्या निमित्ताने डॉ. सुधा मूर्ती या बापार्डे गावात आल्या होत्या.  यावेळी त्यांनी बापार्डे ग्रामपंचायतीला भेट देत ग्रामपंचातीने राबविलेल्या विविध उपक्रमांची व पुरस्काराबाबत थोडक्यात माहिती सरपंच संजय लाड व ग्रामसेवक शिवराज राठोड यांच्याकडून जाणून घेतली.डॉ. सुहास राणे यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी शैक्षणिक तसेच गावच्या समाजकामातही घेतं असलेल्या पुढाकारामुळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावची एक वेगळी ओळख देश, राज्यपातळीवर निर्माण करण्याचे काम या गावाने केले आहे. बापार्डे ग्रामपंचायत सरपंच संजय लाड व ग्रामसेवक शिवराज राठोड यांच्या कामाचेही विशेष कौतुक केले.यावेळी सरपंच संजय लाड, उपसरपंच रमेश देवळेकर, माजी जि, प, उपाध्यक्ष विठ्ठलराव नाईकधुरे, माजी जि, प,सदस्या  अनघा राणे, ग्रामसेवक शिवराज राठोड, माजी सरपंच श्रीकांत नाईकधुरे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष नाईकधुरे,चेअरमन अजित राणे, सदस्य विश्वास नाईकधुरे, प्रियंका राणे, अतुल राणे, संदीप नाईकधुरे, जीवन नाईकधुरे, एम,बी, नाईकधुरे, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSudha Murtyसुधा मूर्ती