शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश, शासकीय वनक्षेत्रातील वृक्षतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 14:27 IST

माणगाव खोऱ्यातील मोरे येथील शासकीय वनक्षेत्रातील अवैध वृक्षतोड प्रकरणातील मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळण्यात वन विभागाला यश आले आहे.

ठळक मुद्देमुख्य आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश, शासकीय वनक्षेत्रातील वृक्षतोड दोघे ताब्यात, दोन दिवसांची वनकोठडी

कुडाळ : माणगाव खोऱ्यातील मोरे येथील शासकीय वनक्षेत्रातील अवैध वृक्षतोड प्रकरणातील मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळण्यात वन विभागाला यश आले आहे.

वनकोठडीत असलेल्या सावंत पिता-पुत्रांच्या कबुली जबाबानुसार मुख्य आरोपी अनिल परब (रा. आंबेगाव-सुतारवाडी) व सावळाराम कृष्णा जाधव (आंबेगाव-चावडीवाडी) या दोघांना  ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची वनकोठडी सुनावली. दरम्यान, सावंत पितापुत्रांची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली.मोरे येथील शासकीय वनक्षेत्रातील सुमारे २१ हजार ७० रुपये किमतीच्या आठ सागांच्या अवैध तोडप्रकरणी मंगळवारी वन विभागाने आंबेगाव येथील देविदास सावंत व अक्षय सावंत या पितापुत्रांना अटक केली होती.

न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची वन कोठडी सुनावली होती. अधिक चौकशीदरम्यान त्यांनी दिलेल्या कबुलीजबाबात या प्रकरणात अनिल परब व सावळाराम जाधव या दोघांचा हात असल्याचे समोर आले. त्यानुसार वन अधिकाऱ्यांनी  अनिल परब याच्या आंबेगाव येथील घर व घराच्या परिसराची छाननी केली.

यावेळी झुडपात लपवून ठेवलेले सागाचे चौफळ नग १४ व घरातून चौकटीसाठी तयार केलेले सागाचे चौफळ नग ८ असा सुमारे ११ हजार ७६ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. तर परब याचा सहकारी जाधव याला आंबेगाव-चावडीवाडी येथून ताब्यात घेतले.चारही आरोपींनी मोरे गावाच्या शासकीय वनांत वृक्षतोड केलेली बुडे प्रत्यक्ष दाखवून अवैध वृक्षतोड करून त्याची विक्री केल्याचा गुन्हा कबूल केला. परब व जाधव यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची वनकोठडी सुनावली. तर देविदास सावंत व अक्षय सावंत यांची जामिनावर मुक्तता केली.या गुन्ह्याचा अधिक तपास उपवनसंरक्षक समाधान चव्हाण व सहाय्यक वनसंरक्षक सुभाष पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ वनक्षेत्रपाल प्र. गो. कोकितकर करीत आहेत.

तपासकामात कडावल वनक्षेत्रपाल अमोल चिरमे, सावंतवाडी वनक्षेत्रपाल गजानन पानपठे, माणगाव वनपाल सु. प्र. सावंत, कालेली वनरक्षक सु. शि. भंडारे, वाडोस वनरक्षक पी. यू. पाटील, माणगाव वनरक्षक गु. मा. देवळी, तुळस वनरक्षक सा. स. कांबळे, मठ वनरक्षक वि. श. नरळे, नेरुर वनपाल वि. ना. मयेकर, नेरुर वनरक्षक सु. म. सावंत, कुडाळ-कडावल रेंज स्टाफ, कर्मचाऱ्याचे सहकार्य लाभले.वन्य तस्करांना ताब्यात घेणारदरम्यान, या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या अन्य तस्करांना ताब्यात घेऊन त्यांचा पर्दाफाश करण्यासाठी वनविभाग अहोरात्र सक्रिय असून त्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना ताब्यात घेणार असल्याची माहिती कुडाळ वनक्षेत्रपाल कोकितकर यांनी दिली. 

टॅग्स :forest departmentवनविभागsindhudurgसिंधुदुर्ग