शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गमधील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी अभ्यास मोहीम : गणेश रघुवीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 17:27 IST

fort, sindhudurgnews सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेच्या दुर्गसंवर्धन मोहिमेंतर्गत वारसा दिनानिमित्त संस्थेच्या सिंधुदुर्ग विभागाच्या दुर्गसेवकांनी मालवणमधील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गसह पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट येथे भेट देत या किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत अभ्यास केला.

ठळक मुद्दे सिंधुदुर्गमधील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी अभ्यास मोहीम : गणेश रघुवीर सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांचा उपक्रम

मालवण : सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेच्या दुर्गसंवर्धन मोहिमेंतर्गत वारसा दिनानिमित्त संस्थेच्या सिंधुदुर्ग विभागाच्या दुर्गसेवकांनी मालवणमधील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गसह पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट येथे भेट देत या किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत अभ्यास केला.

किल्ले सिंधुदुर्गच्या संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना राबविण्यासाठी पुरातत्त्व विभागाचे लक्ष वेधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेमार्फत ही कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी दिली.सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र संस्थेच्या सिंधुदुर्ग विभागाच्या दुर्गसेवकांच्या पथकाने किल्ले सिंधुदुर्गला भेट देत किल्ल्याची तटबंदी, प्रवेशद्वार, मंदिरे, विहिरी यांच्या संवर्धनासाठी आवश्यक ती माहिती संकलित केली.

या मोहिमेत सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्रचे नितीन पानवलकर, विल्सन रॉड्रिक्स, विवेक गावडे, रोहन पुळासकर-सावंत, सुनील राऊळ, सुधीर राऊळ, ज्ञानेश्वर राणे, सिद्धेश परब, केदार देसाई, भास्कर मसदेकर, अनिकेत चव्हाण, रूपेश मगर, प्रज्योत खडपकर, शुभम खडपकर, ॠतुराज खडपकर, अक्षय गावडे आदी दुर्गसेवक सहभागी होते.किल्ले जिवंत ठेवायचे असतील तर संवर्धन हवेगणेश रघुवीर म्हणाले, सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेमार्फत आजपर्यंत विविध किल्ल्यांवर ९०० हून अधिक दुर्गसंवर्धन मोहिमा तर १७०० अधिक दुर्गदर्शन मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्याबरोबरच उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, बिहार, दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ या राज्यांतील गड किल्ल्यांवर संस्थेने अभ्यास मोहिमा राबविल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह इतिहासातील आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे हे किल्ले जिवंत ठेवायचे असतील तर त्यांचे संवर्धन आपल्यालाच करावे लागणार आहे. 

टॅग्स :Fortगडsindhudurgसिंधुदुर्ग