शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुंबईतील विद्यार्थ्यांचा बांबूकलेचा अभ्यास, कुडाळमध्ये घेतायेत खास प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 13:12 IST

बांबूपासुन बनविण्यात येणाऱ्या कलात्मक वस्तुंचं प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबई येथील राष्ट्रीय इन्स्टीट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थी आले आहेत.

कुडाळ-  बांबूपासुन बनविण्यात येणाऱ्या कलात्मक वस्तुंचं प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबई येथील राष्ट्रीय इन्स्टीट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थी आले आहेत. ते कुडाळ मध्ये पाच दिवस करणार बांबु कलेचा अभ्यास करणार आहेत.

कोकणातील व विशेष करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांबू, माणगा या क्षेत्रात काम करणाऱ्या कारागीर, कलाकारांनी पारंपारिक वस्तू बनविण्याबरोबरच या बांबू पासून मोठ्या प्रमाणात कलात्मक वस्तु निर्माण करण्यास सुरूवात केली असून या वस्तुंना ग्राहकांकडूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या वस्तु कशा बनविल्या जातात, या वस्तुमध्ये आणखी कशा पध्दतीने नवीन आकार तयार करता येतील, ग्राहकांच्या पसंतीस या वस्तु कशा उतरतील याचा अभ्यास व बांबु वस्तुचे प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबई येथील राष्ट्रीय इन्स्टीट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षातील अंकीता मल्होत्रा, अदत्त देव, पुजा पालक, साम्या खान, ऐश्वर्या पाठारे, दिप्ती नायर, पारसमनी मोदी, अन्यना राज, निकीता वाजपेयी, हर्षद शर्मा, श्रृती गोडे हे विद्यार्थी व विद्यार्थीनी कुडाळ डॉ. आंबेडकर नगर येथे आले असून प्रशिक्षिका लता मालवणकर या त्यांना बांबु पासून कलात्मक वस्तू कशा बनवाव्यात याचे प्रशिक्षण देत आहेत.यावेळी बोलताना विद्यार्थ्यानी सांगितले की, त्यांच्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात कार्यानुभव विषयामध्ये अशा प्रकारे विविध कलांचे शिक्षण घेण्यासाठी आलो असून आमच्याच कॉलेजचा दुसरा ग्रुप कुडाळ येथे चित्रकथी या कलेचे प्रशिक्षण घेत आहे.

या विद्यार्थ्यांना बांबु वस्तुंचे मार्गदर्शन सुजाता कुडाळकर व मिनाक्षी कुडाळकर यांनी केले. यावेळी या विद्यार्थ्यांसोबत शिक्षिका टुलिका टडंन या ही उपस्थित होत्या.