शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

अनुजा तेंडोलकर यांना स्ट्राँग वुमन आॅफ एशिया किताब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 16:27 IST

अनुजा तेंडोलकर यांनी महिला गटात चार सुवर्णपदके पटकावली. पॉवरलिफ्टींग गटात खेळून त्यांनी विक्रम प्रस्थापित केल्याने त्यांचा स्ट्राँग वुमन आॅफ एशिया किताबाने सन्मान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

ठळक मुद्देअनुजा तेंडोलकर यांना स्ट्राँग वुमन आॅफ एशिया किताबवयाच्या ६० व्या वर्षी मिळविले यश

वेंगुर्ले : मंगोलिया येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत वेंगुर्ले येथील श्री सातेरी व्यायामशाळेच्या खेळाडू अनुजा तेंडोलकर यांनी महिला गटात चार सुवर्णपदके पटकावली. या गटात खेळून त्यांनी विक्रम प्रस्थापित केल्याने त्यांचा स्ट्राँग वुमन आॅफ एशिया किताबाने सन्मान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.या आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत अनुजा तेंडोलकर यांनी महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टींग असोसिएशनच्यावतीने सहभाग घेत सुवर्णपदकांची लयलूट केली. पॉवरलिफ्टींग स्पर्धेत ८४, ८४+ मास्टर ३ महिला गटात आतापर्यंत कुणीही स्पर्धक सहभागी झाला नव्हता. मात्र अनुजा तेंडोलकर यांनी या गटात सहभाग घेऊन तब्बल चार सुवर्णपदके पटकावली आणि भारतातील महिला स्ट्राँगेस्ट असल्याचे जगाला दाखवून दिले आहे.त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल एशियन पॉवरलिफ्टींग फेडरेशनचे अध्यक्ष फरसीद सुलतानी, भारतीय संघाचे अध्यक्ष व एशियन क्लासिक पॉवरलिफ्टींग फेडरेशनचे सचिव राजेश तिवारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच सातेरी व्यायामशाळा यांच्यासह जिल्हावासीयांकडूनही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशभरातून ५०० हून अधिक स्पर्धक विविध गटातून सहभागी झाले होते. त्यात भारतातील विविध राज्यातील नामवंत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा सहभाग होता. या सर्वांवर मात करीत वयाच्या ६० व्या वर्षी मिळविलेल्या या यशामुळे अनुजा तेंडोलकर सिंधुदुर्गच्या आयर्न लेडी ठरल्या आहेत. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गWomenमहिला