शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
4
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
5
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
6
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
7
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
8
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
9
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
10
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
11
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
12
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
13
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
14
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
15
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
16
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
17
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
18
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
19
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
20
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?

कचरा प्रकल्पाला तीव्र विरोध, कारिवडेवासीय आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 12:55 IST

Garbage Disposal Issue, sindhdurug, kariwadegrampanchyat सावंतवाडी नगरपरिषदेने कारिवडे येथील सर्व्हे नंबर १२४ (ब), हिस्सा नंबर १, क्षेत्र ५ एकर या जागेत घनकचरा टाकणे व कुंपण भिंत घालण्याचे काम सुरू करणार असल्याचे कळवून एका पत्रामध्ये गांडूळ खत प्रकल्प तर दुसºया पत्रात बायोगॅस प्रकल्प, प्लास्टिक प्रोसेसिंग युनिट आदी प्रकल्प अशी परस्पर विरोधी पत्रे देऊन कारिवडे ग्रामपंचायतीची दिशाभूल केली आहे.

ठळक मुद्देकचरा प्रकल्पाला तीव्र विरोध, कारिवडेवासीय आक्रमक प्रकल्प केल्यास आंदोलन, सावंतवाडी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेने कारिवडे येथील सर्व्हे नंबर १२४ (ब), हिस्सा नंबर १, क्षेत्र ५ एकर या जागेत घनकचरा टाकणे व कुंपण भिंत घालण्याचे काम सुरू करणार असल्याचे कळवून एका पत्रामध्ये गांडूळ खत प्रकल्प तर दुसऱ्या पत्रात बायोगॅस प्रकल्प, प्लास्टिक प्रोसेसिंग युनिट आदी प्रकल्प अशी परस्पर विरोधी पत्रे देऊन कारिवडे ग्रामपंचायतीची दिशाभूल केली आहे.कारिवडे येथे होऊ घातलेल्या कचरा प्रकल्पाला आमचा विरोध आहे. असे असताना कचरा प्रकल्प लादण्याचा प्रकार केल्यास आम्ही गप्प बसणार नाही. प्रसंगी आंदोलन छेडू, असा इशारा कारिवडे ग्रामस्थांनी दिला आहे.कारिवडे वासीयांनी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले आहे. तसेच या निवेदनात प्रकल्पाला कारिवडे ग्रामपंचायतीचा विरोध असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हा प्रकल्प येथे होऊ नये असेही कळविण्यात आले आहे.या निवेदनावर कारिवडे सरपंंच अपर्णा तळवणेकर, माजी आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर, अशोक माळकर, पंचायत समिती सदस्य प्राजक्ता केळुस्कर, आनंद तळवणेकर, तुकाराम आमुणेकर, प्रमिला पालव, अनुपमा चव्हाण, वसंत पार्सेकर, विष्णू तळवणेकर आदींनी सह्या केल्या आहेत. त्यामुळे भविष्यात या कचरा प्रकल्पावरून राजकारण तापणार आहे.पालिकेचा प्रकल्प लादण्याचा घाटनिवेदनात म्हटले आहे की, ७ एप्रिल २०१७ रोजी माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर व कारिवडे ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी सावंतवाडी यांच्या कार्यालयासमोर उपोषण छेडले होते.

उपोषणकर्ते व उपविभागीय अधिकारी यांनी चर्चेअंती झालेल्या बोलण्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व कारिवडे ग्रामस्थ त्या जागेची पाहणी करून निर्णय घेण्याचे ठरले होते. मात्र, त्याबाबत अद्याप उचित कार्यवाही झाली नाही. असे असताना सावंतवाडी नगरपरिषद प्रशासन येथे कायमस्वरूपी कचरा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेत आहे. तसेच मशिनरीही बसवित आहे.कचरा डेपो म्हणजे ग्रामस्थांच्या जीवाशी खेळसध्या जनता कोरोनामुळे हैराण आहे. असे असताना प्रशासनाला पुढे करून कचरा प्रकल्प केला जाऊ नये. अन्यथा पालिकेला गंभीर परिणाम भोगावे लागतील. असे प्रकार झाल्यास आम्हांला आंदोलानाचाही पवित्रा घ्यावा लागेल. कचरा डेपो म्हणजे कारिवडे ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ आहे. त्यामुळे हा कचरा डेपो होऊ नये अशी मागणीही यावेळी या पत्रकातून करण्यात आली आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नsindhudurgसिंधुदुर्गgram panchayatग्राम पंचायत