शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रॅलीतून मराठा समाजाचे जोरदार शक्तिप्रदर्शन

By admin | Updated: October 18, 2016 23:48 IST

सावंतवाडीत आयोजन : मोठ्या संख्येने बांधव सहभागी, फटाक्यांची आतषबाजी, शहरातील वातावरण भगवामय

सावंतवाडी : ‘एक मराठा लाख मराठा... जय भवानी जय शिवाजी...’ अशा एकापेक्षा एक घोषणांनी सुंदरवाडीचा परिसर चांगलाच दणाणून सोडत मराठा बांधवांनी सावंतवाडीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले २३ आॅक्टोबरला मराठा समाजाचा क्रांती मोर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी सावंतवाडी येथे तालुक्यातील मराठा बांधवांच्या खास रॅलीचे आयोजन करण्यात आले होत. या रॅलीत शेकडो मराठा बांधव सहभागी झाले होते.सावंतवाडीतील जिमखाना मैदानावरून सकाळी ११ वाजता तालुक्यातील मराठा बांधवांची खास दुचाकी रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीला प्रथम येथील जिमखाना मैदानावर संबोधन करण्यात आले. त्यानंतर ही रॅली सुरू झाली. येथील गवळी तिठा येथे फटाक्याची आतषबाजी केल्यानंतर ही रॅली माठेवाडा येथे आत्मेश्वर मंदिरकडून डॉ. परूळेकर यांच्या हॉस्पिटलला वळसा घालून मुख्य महामार्गावरून खासकीलवाडा येथे आली व तेथे शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ््याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर ही रॅली मोती तलावाकडून शिरोडा नाका येथून मुख्यबाजारपेठ व गांधी चौक असे करीत शिवरामराजेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. तेथून ही रॅली आर. पी. डी. हायस्कूलमध्ये विसर्जित करण्यात आली. रॅलीत विक्रांत सावंत, मनोज नाईक, रूपेश राऊळ, सदानंद सावंत, अ‍ॅड. श्यामराव सावंत, अ‍ॅड. अमोल कविटकर, नितीन कुडतरकर, उमाकांत वारंग, संदीप सावंत, सीताराम गावडे, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, काँग्रेस नेते विकास सावंत, सभापती प्रमोद सावंत, प्रमोद गावडे, अशोक दळवी, राजू मुळीक, बाळू माळकर, संतोष घाडी, उदय भोसले, लहू भिंगारे, अमित परब, रेश्मा सावंत, भारती मोरे, अर्पणा कोठावळे, विश्वनाथ घाग, संतोष सावंत, मनोज सावंत, यशवंत आमोणेकर आदींसह मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी रॅलीत सहभाग नोंदविला.या रॅलीमुळे वातावरण भगवेमय झाले होते. तसेच सावंतवाडीचा परिसर घोषणांनी दणाणून गेला होता. तब्बल तीन तास रॅली सुरू होती. शहरातील प्रत्येक नाक्या-नाक्यावर अनेकजण रॅलीकडे पाहत होते आणि दाद देत होते. या रॅलीसाठी पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांचे मराठा समाजाच्यावतीने कौतुकही करण्यात आले. या बंदोबस्तात सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी सावंत, उपनिरीक्षक जयदीप कळेकर, सुधाकर आरोलकर, हेडकॉँस्टेबल दाजी सावंत, अमोल सरगळे, विकी गवस, राजलक्ष्मी राणे, अमर नारनवर आदींसह मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)