शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

रेड झोननंतर सीमा नाक्यांवर कडक निर्बंध, सातार्डा दूरक्षेत्रावर मोठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 18:31 IST

CoronaVirus Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने सीमेवरही कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. अचानक प्रशासनाने पवित्रा घेतल्याने सातार्डा येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. अखेर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क केल्यानंतर यावर तात्पुरता तोडगा निघाला असून, यापुढे कडक निर्बंध घातले जातील, असा इशारा तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिला आहे.

ठळक मुद्देरेड झोननंतर सीमा नाक्यांवर कडक निर्बंधसातार्डा दूरक्षेत्रावर मोठी गर्दी

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने सीमेवरही कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. अचानक प्रशासनाने पवित्रा घेतल्याने सातार्डा येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. अखेर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क केल्यानंतर यावर तात्पुरता तोडगा निघाला असून, यापुढे कडक निर्बंध घातले जातील, असा इशारा तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिला आहे. यात कामानिमित्त ये-जा करणाऱ्याची रॅपिड टेस्ट करण्यात येणार असून, त्यानंतरच प्रवेश देणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्याच्या काढलेल्या आदेशानुसार गोवा हद्दीलगत असलेल्या जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे गोव्यात कामानिमित्त ये-जा करणाऱ्या व्यक्तींसमोर मोठी समस्या निर्माण झाली.

गोव्यात कामानिमित्त जाणाऱ्या व्यक्तींची आरोंदा व सातार्डा चेक पोस्टवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सातार्डा पोलीस दूरक्षेत्रावर जिल्ह्यातून गोव्यात व गोवा राज्यातून जिल्ह्यात येण्यास मज्जाव केला जात असल्याने जिल्ह्यातील एकाही व्यक्तीला गोव्यात न सोडण्याच्या सूचना दिल्या.आरटीपीसीआर सात दिवसांसाठी वैधज्या व्यक्तींची रॅपिड टेस्ट निगेटिव्ह येईल, त्यांची आरटीपीसीआर टेस्ट केली जाईल. ही टेस्ट निगेटिव्ह आल्यास तिचा रिपोर्ट सात दिवसांसाठी वैध राहील. मात्र सात दिवसांनंतर पुन्हा आर टी पी सी आर टेस्ट करून निगेटिव्ह रिपोर्ट असणाऱ्या व्यक्तींना गोव्यातून जा-ये करण्याची मुभा राहील, अशी माहिती तहसीलदार म्हात्रे यांनी दिली असल्याचे स्पष्ट केले.रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास विलगीकरणात रवानगीया संदर्भात तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याशी मळेवाड कोंडुरे सरपंच हेमंत मराठे यांनी संपर्क साधून गोव्यात कामानिमित्त ये-जा करणाऱ्या व्यक्तींसाठी योग्य तो पर्याय काढावा, अशी विनंती केली असता आज गोव्यात जाणाऱ्या व्यक्तींना गोव्यात प्रवेश दिला जाईल. मात्र गोव्यातून जिल्ह्यात प्रवेश करीत असताना सर्व व्यक्तींची रॅपिड टेस्ट केली जाईल. ज्या व्यक्तींची रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह येईल, त्यांना तत्काळ विलगीकरणात दाखल केले जाईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग