शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाहतूक नियमांची होणार कडक अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 16:30 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निदेर्शानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. सरद कारवाई अधिक कडक व प्रभावीपणे करण्याच्या सूचना आज येथे निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रस्ते सुरक्षा समितीची बैठक झाली त्यावेळी या सूचना देण्यात आल्या.

ठळक मुद्दे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाहतूक नियमांची होणार कडक अंमलबजावणीवाहतूक नियम भंगाबद्दल २५ लाखांपेक्षा जास्त दंड वसूल

सिंधुदुर्गनगरी : सर्वोच्च न्यायालयाच्या निदेर्शानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. सरद कारवाई अधिक कडक व प्रभावीपणे करण्याच्या सूचना आज येथे निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रस्ते सुरक्षा समितीची बैठक झाली त्यावेळी या सूचना देण्यात आल्या.सर्वोच्च न्यायालयाने वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगून निवासी उपजिल्हाधिकारी  जोशी पुढे म्हणाले की, विना हेल्मेट वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे, सीट बेल्टचा वापर न करणे, मद्य प्राशन करुन वाहन चालवणे या सारख्या जीविताशी संबंधीत गुन्ह्यांवर कारवाई करण्यात येत आहे. याची आमंलबजावणी प्रभावीपणे करावी तसेच कारवाई आणखी कडक करावी.

या कारवाईअंतर्गत शासकीय वाहनांवरही कारवाई करण्यात आली आहे. तसेच पोलिस विभागाच्या वाहनांवरही कारवाई केली आहे. या कारवाई विषयी नागरिकांमध्ये जागृती होण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी कारवाई व दंडाच्या रकमेविषयी माहिती देणारे बॅनर्स लावण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.या कारवाई अंतर्गत आतापर्यंत साडे तीन हजार पेक्षा जास्त वाहनांवर कारवाई करण्यात आली असून दंडापोटी पंचवीस लाखांपेक्षा जास्त रक्कम वसूल करण्यात आल्याची माहिती बैठकीमध्ये देण्यात आली. तसेच बसस्थानक, बाजरपेठांसह नगरपालीका क्षेत्रांमध्ये बॅनर्स लावण्यात आल्याची माहितीही देण्यात आली.

याशिवाय या कारवाई दरम्यान काही नागरिक दबाव आणत असल्याचा मुद्दा ही उपस्थित करण्यात आला. यावर सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश व नागरिकांच्या जीविताचा विचार करता कोणत्याही प्रकारच्या दबावास बळी न पडण्याच्या सूचना संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.

नागरिकांना वाहतूक नियमांचे योग्य रित्या पालन करावे व कोणत्याही प्रकारच्या कारवाईवेळी दबावतंत्राचा वापर करु नये असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले. सदर कारवाई ही नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहे. कोणत्याही प्रकारचा दंड वसुल करणे किंवा महसूल वाढवणे यासाठीची ही कारवाई नसून जीविताच्या सुरक्षेशी संबंधीत कारवाई आहे.

रस्ते सुरक्षा हा जिवन मरणाचा प्रश्न असून रस्ते वाहतुकीच्या नियमांचे सर्वांनी योग्य पालन करणे महत्वाचे आहे. अशा कारवाईवेळी दबाव आणून कारवाई टाळणे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे हे सर्वस्वी नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे. त्यामुळे कारवाईमध्ये कोणताही अडथळा आणू नये असे आवाहन यावेळी करण्यात आले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीsindhudurgसिंधुदुर्ग