शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांचे रास्तारोको आंदोलन, दभोली-खानोलीवासीय आक्रमक : रस्त्याची चाळण, अपघात वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 19:19 IST

दाभोली-खानोलीमार्गे कुडाळ या रस्त्याची खड्ड्यांनी झालेली दुरवस्था आणि त्यामुळे वारंवार होणारे अपघात याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच या रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी दाभोली व खानोली ग्रामस्थांनी दोन तास रास्तारोको आंदोलन केले. बांधकाम विभागाचे उपअभियंता अनिल आवटे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

ठळक मुद्दे कार्यवाही न झाल्याने दाभोली व खानोली ग्रामस्थाचे रास्तारोको आंदोलन अनिल आवटे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प

वेंगुर्ले : दाभोली-खानोलीमार्गे कुडाळ या रस्त्याची खड्ड्यांनी झालेली दुरवस्था आणि त्यामुळे वारंवार होणारे अपघात याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच या रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी दाभोली व खानोली ग्रामस्थांनी  दोन तास रास्तारोको आंदोलन केले. बांधकाम विभागाचे उपअभियंता अनिल आवटे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.दाभोली-खानोलीमार्गे कुडाळ रस्त्याचे नऊ वर्षांपूर्वी डांबरीकरण झाले होते. त्यानंतर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवर पावसाळ््यात मलमपट्टी केली जात होती. येथील दाभोली, खानोली आणि वेतोरे ग्रामस्थांच्या दृष्टीने हा मार्ग अतिशय महत्त्वाचा असल्याने या खड्डेमय रस्त्याचे डांबरीकरण करणे गरजेचे असताना सार्वजनिक बांधकाम खात्याकडून केवळ खड्डे बुजविण्याचे काम केले जात होते.

आठ दिवसांपूर्वी असेच काम सुरू असताना ग्रामस्थांनी तात्पुरती मलमपट्टी न करता रस्त्याचे डांबरीकरण करा, अशी मागणी केली होती. अन्यथा १३ रोजी आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. संबंधित विभागाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने दाभोली व खानोली ग्रामस्थांनी  रास्तारोको आंदोलन केले.

सकाळी ११ वाजता सुरु झालेल्या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते अमित दाभोलकर, खानोलीचे माजी सरपंच महेश खानोलकर, दाभोली ग्रामपंचायत सदस्य स्वाती मांजरेकर, श्रीकृष्ण बांदवलकर, मनोहर कांदळकर, दादा सारंग, सुनील तेंडोलकर, राजन गोवेकर तसेच इतर ग्रामस्थ सहभागी झाले होते.

यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. अखेर दुपारी १ वाजता बांधकाम विभागाचे उपअभियंता अनिल आवटे व एस. एस. पाटील यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. या रस्त्याच्या कामाला प्राधान्याने मंजुरी देण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गpwdसार्वजनिक बांधकाम विभाग