शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वादळसदृश परिस्थिती; मच्छीमार नौका बंदरावर स्थिरावल्या, मत्स्य व्यवसाय अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 14:29 IST

बदलत्या वातावरणाचा परिणाम आंब्याबरोबरच मत्स्य व्यावसायिकांनादेखील होत आहे.

देवगड : अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा व वारंवार पाऊस, वादळसदृश परिस्थिती निर्माण होत असल्याने याचा विपरीत परिणाम सागरी मच्छीमारी व्यवसायावर होत आहे. गेले दोन दिवस समुद्र खवळलेला असून, हवामान विभागाच्या दक्षतेच्या सूचनेमुळे अनेक मच्छीमारांनी आपल्या नौका समुद्रकिनारीच उभ्या करून ठेवल्या आहेत.देवगड तालुक्यामध्ये आंबा व मत्स्य व्यवसायावरती हजारो कुटुंबे अवलंबून आहेत. मात्र, बदलत्या वातावरणाचा परिणाम आंब्याबरोबरच मत्स्य व्यावसायिकांनादेखील होत आहे. गेल्या महिनाभरामधील वादळसदृश परिस्थिती व अवकाळी पावसामुळे देवगडमधील मच्छीमारी व्यवसायावर परिणाम झाला आहे.ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस देवगड बंदरामध्ये चांगल्या प्रकारे मच्छीमारी व्यावसायिकांना मच्छी मिळत होती. मात्र, सुरुवातीच्या मौसमामध्ये मच्छी मिळू लागल्याने मच्छीमार बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण असतानाच नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच वादळसदृश परिस्थिती व अवकाळी पावसामुळे मासेमारी ठप्प झाली होती. गेले २० ते २५ दिवस समुद्रामधील वातावरणामुळे मासेमारी करण्यास योग्य नसल्यामुळे अनेक मच्छीमारी बांधवांनी आपल्या नौका समुद्रकिनारी उभ्या करून ठेवल्या आहेत. मासेमारी हंगामातच समुद्रातील वादळसदृश परिस्थितीचा मच्छीमारांना फटका बसत आहे.समुद्रातील वातावरण निवळण्याची प्रतीक्षामासळीची उलाढाल मंदावली असून, याचा फटका व्यावसायिकांना बसला आहे. वारंवार बदलत्या वातावरणामध्ये व वादळसदृश परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे समुद्रामध्ये मासेमारीसाठी जाणे धोकादायक असल्याने मच्छीमार बांधवांनी मासेमारी जाण्याचे टाळले आहे. सद्य:स्थितीमध्ये समुद्रामध्ये मासेमारी करण्यास मच्छीमार गेल्यास त्यांना मासळी मिळेल याची शाश्वती नसल्यामुळेच तोटा सहन करण्याची जोखीम पतकरण्यास मच्छीमार तयार नाहीत. येत्या काही दिवसांत समुद्रातील वातावरण निवळून मासेमारी केली जाण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. - द्विजकांत कोयंडे मच्छीमार, देवगड

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfishermanमच्छीमारweatherहवामान