शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मार्चअखेर निधी खर्ची घालण्याची प्रथा बंद करा, पालकमंत्री रवींद्र चव्हाणांनी अधिकाऱ्यांना खडसावलं 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: December 22, 2023 17:36 IST

केवळ २० टक्के खर्चाबाबत जिल्हा नियोजन समिती सभेत व्यक्त केली नाराजी 

सिंधुदुर्ग : जिल्हा नियोजनकडील चालू वर्षातील केवळ २० टक्केच निधी खर्च झाला असून, उर्वरित ८० टक्के निधी २ महिन्यांत कसा काय खर्च करणार, असा प्रश्न करत जिल्हा नियोजनाचा ८० तक्के निधी अखर्चित असल्याकडे आमदार वैभव नाईक यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. केवळ २० टक्के खर्चाबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. गतवर्षी एका अधिकाऱ्याने निधी खर्च केला नाही, त्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली असल्याचे सांगतानाच मार्चअखेर निधी खर्ची घालण्याची प्रथा बंद करा. आणि फेब्रुवारी अखेर १०० टक्के निधी खर्च करा, अशी सक्त ताकीद शुक्रवारी झालेल्या नियोजन समिती सभेत दिली.येथील नवीन जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी भगवान पवार, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आदी उपस्थित होते.

सावंतवाडी तालुक्यातील क्रीडा संकूल बांद्यातसावंतवाडी तालुक्यात मंजूर असलेले क्रीडा संकूल बांदा येथे बांधण्यात येणार असून, यासाठी जिल्हा नियोजनमधून ३ कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी केली. तसेच या ठिकाणी शासकीय बोर्डिंग सुरू केले जाणार असून, त्यांच्यामार्फत या क्रीडा संकूलची देखभाल केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.सावंतवाडी टर्मिनलला जोडणारा रस्ता खराबजिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जात आहे. मात्र, सावंतवाडी टर्मिनल याठिकाणी जाणाऱ्या काँक्रिटीकरण रस्त्याला जोडणारा ७०० मीटरचा रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे त्या रस्त्यासाठी निधी द्या अशी मागणी मंत्री केसरकर यांनी केली.

त्याच ठिकाणी पुन्हा नियुक्ती

मालवण तालुक्यातील चिंदर येथील तलाठ्यांचे एका प्रकरणात निलंबन करण्यात आले होते. मात्र, काही महिन्यांनी त्यांना सेवेत घेताना अन्य ठिकाणी नियुक्ती न देता त्याच ठिकाणी नियुक्ती दिल्याकडे आमदार वैभव नाईक यांनी सभेत सांगितले. तसेच प्रशासनाच्या भोंगळ कारभाराकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPlanning Commissionनियोजन आयोगguardian ministerपालक मंत्री