शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

व्हेलच्या उलटीसंदर्भात मच्छीमारांचा नाहक छळ थांबवा - रविकिरण तोरसकर 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 3, 2024 16:50 IST

मच्छीमारांवरील अन्याय खपवून घेणार नाही

संदीप बोडवेमालवण : दोन आठवड्यांपूर्वी व्हेल माशाची उलटीच्या तस्करीसंदर्भात मच्छीमारांना होणारा त्रास थांबविण्यात यावा, अशी मागणी भाजपा मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.मालवण किनारपट्टीवरून चार संशयितांना सांगली-मिरज पोलिसांनी अटक केली होती. यावेळी १९ कोटी रुपयांची १९ किलो उलटी संशयितांकडून जप्त करण्यात आली, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला, तसेच किनारपट्टीवरील व मालवण शहरातील काही प्रतिष्ठित कुटुंबांची नावे घेऊन संशयित यांची एक मोठी यादी सांगली-मिरज पोलिसांनी बनविली आहे, अशी खात्रीलायक बातमी हाती आली आहे, तसेच काही महिलांना या प्रकरणात गुंतवून पोलिस यंत्रणा चुकीच्या प्रकारे तपास करत आहेत. तसेच, तपासादरम्यान काही मच्छीमारांना मारहाण केल्याचे वृत्त हाती आले आहे.

मच्छीमारांवरील अन्याय खपवून घेणार नाहीसंबंधित विषयात पोलिस मच्छीमार समाजाला नाहक त्रास देत असून, पोलिसांचा तपास चुकीच्या दिशेने चालला आहे. त्यामुळे काही मच्छीमार कुटुंब अटकेच्या भीतीने परागंदा झाली आहेत. त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. मच्छीमार समाजाला होणाऱ्या या त्रासाची गंभीर दखल सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टी, मच्छीमार सेल यांनी घेतली असून, बुधवारी कुडाळ येथील बैठकीत या विषयात पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे लक्ष घालून हस्तक्षेप करण्याची मागणी करणार आहे. मच्छीमार समाजावर होणारा अन्याय कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असे तोरसकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfishermanमच्छीमार