शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पाईपलाईन खोदाईचे काम थांबवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 15:32 IST

बांदा-शिरोडा मार्गावर सुरू असलेले पाईपलाईन खोदाईचे धोकादायक काम शुक्रवारी ग्रामस्थांनी रोखले होते. याविषयी चर्चा करण्यासाठी शनिवारी मडुरा ग्रामपंचायत कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

ठळक मुद्देपाईपलाईन खोदाईचे काम थांबवाचमडुरा येथील बैठकीत कडक निर्णय

बांदा : बांदा-शिरोडा मार्गावर सुरू असलेले पाईपलाईन खोदाईचे धोकादायक काम शुक्रवारी ग्रामस्थांनी रोखले होते. याविषयी चर्चा करण्यासाठी शनिवारी मडुरा ग्रामपंचायत कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

मडुरा ग्रामपंचायतीत झालेल्या बैठकीत ते धोकादायक काम थांबविण्याचे निर्देश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच ते काम प्रशासनाचे नियम डावलून सुरू असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी यावेळी केला. मात्र, बांधकाम विभागाचा कोणताही अधिकारी न आल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या दोडामार्ग-हेदूस ते वेंगुर्ला असे पाणीपुरवठा पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. अशा प्रकल्पांचा मडुरा गावाला लाभ होणार असल्याने प्रशासनाचे सहकार्य असल्याचे सरपंच साक्षी तोरसकर यांनी सांगितले.

यावेळी सदस्या माधुरी वालावलकर म्हणाल्या की, पाईपलाईन खोदाईची हद्द बांधकाम विभागाने आखून दिली आहे. त्याप्रमाणे काम होत नाही. रस्त्यापासून निदान पाच फुटांवर खोदाई अपेक्षित असून रस्त्याला लागूनच खोदाई केल्याने पूर्ण रस्ता धोकादायक बनला आहे. ज्या ठिकाणी मनुष्यबळाचा वापर करून काम अपेक्षित आहे त्याठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने खोदाई केल्याने रस्ता धोकादायक बनल्याचे बाळू गावडे म्हणाले.

उपसरपंच विजय वालावलकर यांनीही या कामाबाबत आक्षेप घेतला. यावेळी सरपंच साक्षी तोरसकर, उपसरपंच विजय वालावलकर, सदस्य माधुरी वालावलकर, स्वाती परब, शशिकांत परब, सखाराम परब, सानिका वेंगुर्लेकर, साक्षी परब, माजी उपसरपंच उल्हास परब, ग्रामकमिटी माजी अध्यक्ष दिलीप परब यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

पुन्हा बैठक बोलविणारशेवटी सार्वजनिक बांधकाम विभाग, एमजीपी कंपनी अधिकारी व ग्रामस्थांची पुन्हा एकदा मंगळवार २४ रोजी बैठक बोलविण्याचे ठरविण्यात आले.

टॅग्स :Waterपाणीsindhudurgसिंधुदुर्ग