शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामास प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 05:14 IST

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असताना कणकवली शहरात मात्र प्रकल्पग्रस्तांच्या विरोधामुळे गेले काही महिने काम थांबविण्यात आले होते.

कणकवली : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असताना कणकवली शहरात मात्र प्रकल्पग्रस्तांच्या विरोधामुळे गेले काही महिने काम थांबविण्यात आले होते. अखेर २० आॅक्टोबरपासून कणकवली शासकीय विश्रामगृह येथून महामार्ग रुंदीकरणाचे काम पुन्हा हाती घेण्यात आले आहे. तर शहरातील अनेक प्रकल्पग्रस्तांनी स्वत:हून महामार्ग सीमांकन क्षेत्रातील अतिक्रमण किंवा आपली दुकाने, घरे रिकामी केली. रविवारी जानवली नदीपासून विविध दुकानांचे फलक संबंधित ठेकेदाराने यंत्राच्या साहाय्याने हटविले.सिंधुदुर्गातील संवेदनशील शहर म्हणून कणकवलीची ओळख आहे. या शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न महामार्गाचे काम करत असताना निर्माण होण्याची शक्यता आहे. काम गतीने करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून असल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांनी विरोध झाला तरी वेळप्रसंगी पोलिसी बळाचा वापर करू, असा इशारा दिला आहे. कणकवलीत महामार्ग चौपदरीकरणाचे काम ४५ मीटरनुसार होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची यापूर्वीच भूसंपादन असलेली जागा ३० मीटर आहे. या ३० मीटरमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे, घरे, स्टॉल बांधण्यात आले आहेत. त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी आम्ही काम सुरू केलेले आहे. महामार्ग रुंदीकरण करण्याची पहिली प्रक्रिया करण्यात येईल. त्यानंतर फ्लायओव्हरचे काम हाती घेण्यात येईल. फ्लाय ओव्हरचे पीलर उभे करण्यापूर्वी वाहतुकीसाठी सर्व्हिस रोड बांधण्यात येणार असल्याचे शेडेकर यांनी सांगितले .मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ चे चौपदरीकरण करत असताना कणकवली शहराचा विकास होण्याच्या दृष्टीने आमचे सर्वतोपरी प्रयत्न असणार आहेत. कणकवलीत बॉक्ससेल ब्रिज मंजूर असताना तो रद्द करून शासनाने आता वाय आकाराच्या ब्रिजची मंजुरी दिली आहे. त्यामुळे कणकवली शहराला साजेसा हा रस्ता होणार आहे. ४५ पीलर या ब्रिजसाठी लागणार आहेत. त्यामुळे चौपदरीकरणाचे काम करत असताना प्रकल्पग्रस्त आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन शेडेकर यांनी केले आहे.>कणकवली शहरातील ४५ मीटरची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. वीजवाहिन्या, दूरध्वनी सेवेच्या वायर व वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या ४५ मीटरमध्ये गटार व पदपथाबरोबरच सर्व्हिस रोड असणार आहेत. वीजवाहिन्या अंडर ग्राउंड टाकण्यात येणार आहेत. दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड वाहतुकीसाठी खुले असणार आहेत. त्यानंतर ४५ पीलरचा सहा पदरी फ्लायओव्हर ब्रिज बांधण्यात येणार आहे.- प्रकाश शेडेकर, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण