शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मसुरकर जुवा बेटावरील बंधाऱ्याचे काम सुरू करा, निलेश राणे आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 17:04 IST

मसुरकर जुवा बेटावरील बंधाऱ्यांसाठी दोन दिवसांत दगड पडायला हवे. दगड न पडल्यास माझ्याशी गाठ आहे. गुन्हा दाखल करायचा असेल तर तो माझ्यावर करा, असा इशारा माजी खासदार निलेश राणे यांनी पत्तन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.

ठळक मुद्देमसुरकर जुवा बेटावरील बंधाऱ्याचे काम सुरू करा, निलेश राणे आक्रमक लोकांचे जीव गेल्यास गुन्हा दाखल करू; पत्तन विभागाला इशारा

मालवण : कोरोनाच्या काळात राज्य सरकार पूर्णपणे भिकारी झाले आहे. बंधाऱ्यांसाठी एक रुपयाचा निधी देणार नाही. त्यामुळे कोणतीही कारणे न सांगता मसुरकर जुवा बेटावरील बंधाऱ्यांसाठी दोन दिवसांत दगड पडायला हवे. दगड न पडल्यास माझ्याशी गाठ आहे. गुन्हा दाखल करायचा असेल तर तो माझ्यावर करा, असा इशारा माजी खासदार निलेश राणे यांनी पत्तन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.गेले अनेक दिवस चर्चेत असलेल्या मालवण मसुरे येथील मसुरकर जुवा बेटावरील बंधारा लोकवस्ती सोडून बांधण्यात आला आहे. त्यामुळे या बंधाऱ्यांचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे बिल अदा करू नये. यासह अन्य मागण्यांसाठी बेटावरील ग्रामस्थांनी सोमवारी माजी खासदार निलेश राणेंची भेट घेतली होती. यावेळी निलेश राणेंनी मी बंधाऱ्यांची पाहणी करणार असल्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. त्यानुसार राणे यांनी मसुरे मसुरकर जुवा बेटावरील बंधाऱ्यांची पाहणी केली.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आशिष हडकर, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, बाबा परब यांसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी निलेश राणेंनी बेटावरील ग्रामस्थांकडून बंधाऱ्यांची माहिती घेतली. त्यानंतर उपस्थित असलेल्या पत्तन विभागाच्या अधिकाऱ्यांचा त्यांनी आपल्या भाषेत समाचार घेतला. लोकवस्ती सोडून बंधारा का बांधला ? लोकांचे जीव गेले तर तुमच्यावर गुन्हा दाखल करू. दोन टोकाला बंधारा बांधला.

तिकडे आमदाराचा कोण नातेवाईक आहे का ? मी आमदारासारखा नाही. जे काही करायचे ते समोर करणार. ठेकेदाराला कोणतेही बिल अदा न करता परवापासून लोकवस्ती ठिकाणी दगड पडायला हवे. कसे टाकायचे, काय करायचे हा तुमचा प्रश्न आहे. येथील काम तत्काळ सुरु झाले पाहिजे, असेही राणे म्हणाले. 

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग