शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

देवगडमध्ये मत्स्य व्यवसाय महाविद्यालय सुरू करा!, नितेश राणेंची मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडे मागणी

By सुधीर राणे | Updated: August 23, 2022 15:41 IST

कोकण किनारपट्टीच्या एकूण ७२० कि.मी. लांबीपैकी सुमारे १२१ कि.मी. लांबी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे.

कणकवली: देवगड येथे मत्स्य व्यवसाय महाविद्यालय सुरू करावे अशी मागणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी एका पत्राद्वारे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.या पत्रात म्हटले आहे की, कोकण किनारपट्टीच्या एकूण ७२० कि.मी. लांबीपैकी सुमारे १२१ कि.मी. लांबी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टी लगतच्या ८७ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी प्रमुख व्यवसाय आहे. जिल्ह्यामध्ये एकूण मच्छीमारांची लोकसंख्या ३२०१७ आहे. त्याचप्रमाणे विजयदुर्ग, देवगड, मालवण, वेंगुर्ले याठिकाणी बंदरे व मच्छीची उतरणावळ करणारे ३४ धक्के आहेत. जिल्ह्यामध्ये अनेक कोल्ड स्टोरेजेस असून त्याद्वारे मच्छीवर प्रक्रिया केली जाते. असे असूनही जिल्हयामध्ये मत्स्य महाविद्यालय नसल्यामुळे येथील तरुणांना आधुनिक मत्स्य व्यवसाय शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे.देवगड तालुक्यामध्ये मत्स्य व्यवसाय महाविद्यालय सुरू करण्यात यावे अशी जिल्ह्यातील जनतेची बरेच वर्षांची मागणी आहे. त्या ठिकाणी मत्स्य व्यवसाय महाविद्यालयीन अभ्यासक्रमासाठी आवश्यक असे योग्य, खारे, निमखारे व गोड्या पाण्याचे स्त्रोत्र उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे आवश्यक पुरेशी जागा, दळणवळणाच्या सोई तसेच आनंदवाडी सारखा मोठा प्रकल्प प्रगती पथामध्ये आहे. याठिकाणी महाविद्यालय सुरू झाल्यास जिल्ह्यातील तरूणांना नोकरी व व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या पदवी, पदव्युत्तर, डॉक्टरेट यासारख्या पदव्या प्राप्त करणे सोईचे होईल. त्यामुळे जनतेच्या मागणीनुसार देवगड येथे मत्स्य व्यवसाय महाविद्यालय सुरू करण्याच्या मागणीला त्वरीत मंजूरी द्यावी असे या पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारfishermanमच्छीमारcollegeमहाविद्यालय