शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समिती सभा : सत्ताधारी-विरोधी सदस्यांमध्ये जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 15:25 IST

vengurla sindhdudurg: वेंगुर्ला सभापतींच्या राजीनामा नाट्याबाबत झालेल्या स्थायी समिती सभेत सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये चांगलीच जुंपली. आपल्याच पक्षाच्या सभापतींच्या राजीनाम्यासाठी संजय पडते यांनी हा दबाव अ‍ाणला, असा आरोप गटनेते रणजित देसाई यांनी  स्थायी सभेत केला. वेंगुर्ला सभापतींच्या राजीनामा नाट्याबाबत झालेल्या स्थायी समिती सभेत सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये चांगलीच जुंपली. आपल्याच पक्षाच्या सभापतींच्या राजीनाम्यासाठी संजय पडते यांनी हा दबाव अ‍ाणला, असा आरोप गटनेते रणजित देसाई यांनी स्थायी सभेत केला.

ठळक मुद्दे स्थायी समिती सभा : सत्ताधारी-विरोधी सदस्यांमध्ये जुंपली राजीनाम्यासाठी दबाव आणल्याचा आरोप

सिंधुदुर्ग : वेंगुर्ला सभापतींच्या राजीनामा नाट्याबाबत झालेल्या स्थायी समिती सभेत सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये चांगलीच जुंपली. आपल्याच पक्षाच्या सभापतींच्या राजीनाम्यासाठी संजय पडते यांनी हा दबाव अ‍ाणला, असा आरोप गटनेते रणजित देसाई यांनी  स्थायी सभेत केला.त्या सभापतींचा राजीनामा टपालातून आला. मात्र, त्याची पडताळणी आपल्या समक्ष करावी, असे लेखी पत्र त्यांना दिले होते. मात्र, त्या रजेवर असल्याने समक्ष आल्या नाहीत अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षांनी देताच विरोधी सदस्यांच्या आरोपाचा मुद्दा फोल ठरला. जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा जिल्हा परिषद अध्यक्षा समीधा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, सभापती बाळा जठार, ‍माधवी बांदेकर, शारदा कांबळे, आदी पदाधिकारी, तर गटनेते रणजित देसाई, संतोष साटविलकर, संजना सावंत, अमरसेन सावंत, दादा कुबल तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी राजेंद्र पराडकर, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.वेंगुर्ला सभापती शिवसेनेच्या असून, त्यांनी या पदाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षांकडे सादर केला होता; हा राजीनामा तत्काळ मंजूर करावा म्हणून संजय पडते आक्रमक झाले. मात्र, या राजीनाम्याबाबत एवढी आक्रमकता का? याबाबत रणजित देसाई यांनी विचारल्याने चांगलीच जुंपली.ठेकेदारांच्या उपोषणाचे स्थायी समितीत पडसादसर्व प्रक्रिया पूर्ण करूनही आणि प्रशासकीय व तांत्रिक मान्यता असतानाही साळगाव, माणगाव रस्त्यावरील संरक्षक भिंतीच्या कामाचा कार्यारंभ आदेश मिळाला नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदार रूपेश धुरी यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषणास प्रारंभ केला आहे. अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कामामुळे जिल्हा परिषदेची बदनामी होत आहे. याबाबत सभापती बाळा जठार, रणजित देसाई, संजना सावंत आदी सदस्यांनी आक्रमक होत सभागृहाचे लक्ष वेधले.

मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर यांनी अधिकारी चुकीचे काम करीत असतील व यात जिल्हा परिषदेची बदनामी होत असेल तर कारवाई करू, अशी तंबी सभागृहातच खातेप्रमुखांना दिली. त्यानंतर लागलीच कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांनी आजच मक्ता मंजुरी देऊन कार्यारंभ आदेश देऊ, असे सांगितल्याने सर्वच सदस्य आक्रमक झाले. उपोषणानंतर आता मक्ता मंजूर करून कार्यारंभ आदेश देत असाल तर संबंधित ठेकेदाराला उपोषणाची वेळ का आली? या दिरंगाईबद्दल अखेर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनीही कार्यकारी अभियंत्यांना जाब विचारला.

टॅग्स :Vengurle Police Stationवेंगुर्ले पोलिस स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग