शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सर्वांनी कार्यक्षमतेने सेवा बजावल्यास एसटी टिकेल : दिलीप पांढरपट्टे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 12:48 IST

खेड्यापाड्यातील सर्वसामान्य प्रवाशांचा आधार एसटीची सेवा आहे. ही सेवा देत असताना सुरक्षितता व जागरूकताही तेवढीच महत्वाची आहे. सिंधुदुर्ग एस . टी . विभागात अपघातांचे प्रमाण कमी आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. मात्र , सर्वांनी कार्यक्षमतेने सेवा बजावली तरच एसटी टिकेल, असे मत जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसर्वांनी कार्यक्षमतेने सेवा बजावल्यास एसटी टिकेल : दिलीप पांढरपट्टे यांचे मत कणकवली येथे एसटीच्या सुरक्षितता मोहिम पंधरवड्याचे आयोजन

कणकवली : खेड्यापाड्यातील सर्वसामान्य प्रवाशांचा आधार एसटीची सेवा आहे. ही सेवा देत असताना सुरक्षितता व जागरूकताही तेवढीच महत्वाची आहे. सिंधुदुर्ग एस . टी . विभागात अपघातांचे प्रमाण कमी आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. मात्र , सर्वांनी कार्यक्षमतेने सेवा बजावली तरच एसटी टिकेल, असे मत जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी व्यक्त केले.राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाच्यावतीने ११ ते २५ जानेवारी २०२० या कालावधीत सुरक्षितता मोहिम पंधरवड्याचे आयोजन केले आहे . या मोहिमेच्या शुभारंभ शनिवारी कणकवली येथे झाला . यावेळी डॉ. दिलीप पांढरपट्टे बोलत होते .यावेळी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ , उपविभागिय पोलीस अधिकारी डॉ . नितीन कटेकर , उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद दळवी , तहसिलदार आर. जे. पवार, एसटीचे विभागिय यंत्र अभियंता आर. एल. कांबळे, कणकवली आगार व्यवस्थापक प्रमोद यादव, इंटकचे विभागिय अध्यक्ष अशोक राणे, कामगार संघटनेचे विभागिय सचिव विनय राणे, श्रीमती कुबडे, निलेश लाड, वाहन निरीक्षक जावेद शिकलगार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, गोसावी, सरनोबत व इतर अधिकारी उपस्थित होते .डॉ. पांढरपट्टे म्हणाले, एसटीला लोकवाहिनी म्हटले जाते. एसटीचा प्रवास म्हणजे सुरक्षित प्रवास ही बाब ग्रामिण भागातील प्रत्येकाच्या मनावर बिंबलेली आहे. एखाद्या किरकोळ चुकीमुळेही गंभीर अपघात होऊ शकतो, यासाठी सुरक्षितता ही अत्यंत महत्वाची आहे. मार्गावर असणाऱ्या होडींग, बॅनर यांच्यावरही नियंत्रण असायला हवे , कारण त्यापासूनही अपघात होऊ शकतात. तसेच चालकांचे आरोग्यही तेवढेच महत्वाचे आहे.त्यादृष्टीने लक्ष देण्याची गरज आहे . जागरूकता कायम ठेवली तर अपघाताचे प्रमाण आणखीन कमी होण्यास निश्चितच मदत होईल, असेही पांढरपट्टे म्हणाले. यावेळी नितीन कटेकर यांनी सुरक्षिततेकडे लक्ष केंद्रीत केले जात आहे, ही बाब निश्चितच चांगली असल्याचे स्पष्ट करताना जगभरातील एकून वाहन संख्येच्या १ टक्के वाहने भारतात आहेत .मात्र जगभरात होणाऱ्या रस्ते अपघाताच्या ६ टक्के अपघात भारतात होतात व एकूण मृत्यूच्या १० टक्के लोक भारतातील मरतात , असे स्पष्ट केले . अनेकदा अपघात वाहनांचा जास्त वेग , दारू पिऊन वाहन चालविणे , वाहन चालविताना बोलणे किंवा चालकाला पुरेशी विश्रांती नसणे यामुळे होत असतात.

प्रसाद दळवी म्हणाले, अपघात सांगून येत नसतात . पण आवश्यक काळजी , सुरक्षितता घेतली तर अपघात टाळता येऊ शकतात . यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना . कायदे करण्यात येत आहेत . मात्र ,केवळ कायदे करून दंड वाढवून प्रश्न सुटणार नाहीत. तर मानसिकतेत बदल व्हायला हवा , असे सांगितले .तर अवैध वाहतूक रोखण्यासाठी पथक कार्यरत असल्याचे सांगितले.प्रास्ताविक करताना प्रकाश रसाळ म्हणाले, गत वर्षभरात सिंधुदुर्ग विभागात ५३ अपघात झाले . यात ६ प्राणांतीक , ३४ गंभीर व १३ किरकोळ होते . यापोटी ८६ लाखांची भरपाई एसटीकडून देण्यात आले आहेत. एसटीकडून सुरक्षिततेबाबतच्या सूचना देण्यात येत असतात. हा पंधरवडा सुरक्षितता मोहिम म्हणून राबविण्यात येत असला तरीही आपण कायम सुरक्षिततेला प्राधान्य देत काम केले पाहिजे , असे संगितले . यावेळी आर . एल . कांबळे , अशोक राणे . विनय राणे आदींनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन अभय खडपकर यांनी केले तर आभार रविंद्र भिसे यांनी मानले . 

टॅग्स :state transportएसटीsindhudurgसिंधुदुर्ग