शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

थकित वेतनामुळे एसटी कर्मचारी त्रस्त, ९ नोव्हेंबर रोजी आक्रोश आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 20:04 IST

StateTransport, sindhdurugnnews एसटी कामगारांना थकित वेतन, देय झालेले वेतन, महागाई भत्त्याची थकबाकी तसेच शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल न मिळाल्यास कर्मचारी आपल्या स्वत:च्या घरासमोर आपल्या कुटुंबीयांसह ९ नोव्हेंबर २०२० रोजी पगार दो...आक्रोश आंदोलन छेडणार असल्याचे मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेचे मुंबई प्रदेश सचिव दिलीप साटम यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देदिलीप साटम यांची माहिती ९ नोव्हेंबरला आंदोलन छेडणार

कणकवली : एसटी कामगारांना थकित वेतन, देय झालेले वेतन, महागाई भत्त्याची थकबाकी तसेच शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल न मिळाल्यास कर्मचारी आपल्या स्वत:च्या घरासमोर आपल्या कुटुंबीयांसह ९ नोव्हेंबर २०२० रोजी पगार दो...आक्रोश आंदोलन छेडणार असल्याचे मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेचे मुंबई प्रदेश सचिव दिलीप साटम यांनी म्हटले आहे.त्यानंतरही कामगारांना थकित वेतन, थकित महागाई भत्ता व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल न मिळाल्यास कामगारांना प्रशासनाविरोधात तीव्र संघर्ष करावा लागेल, असेही त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.कोरोना विषाणूच्या महामारीत एसटी कर्मचारी जीवाची बाजी लावून दिवस-रात्र काम करीत आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत शासनाच्या आदेशानुसार परराज्यातील मजुरांना थेट त्यांच्या राज्यात सोडण्याची कामगिरी एसटीने पार पाडली असून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक तसेच सध्या मुंबई बेस्टची बस वाहतूकही एसटी कर्मचारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत करीत आहेत. यामध्ये महामंडळाचे बरेचसे कर्मचारी कोरोनाबाधित झाले असून सुमारे ७३ कर्मचारी मृत झाले आहेत.

अशा कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना अद्याप विमा कवचाची ५० लाखांची मदत प्रशासनाने दिलेली नाही. कोरोना कालावधीत कामगार प्रतिकूल परिस्थितीत काम करीत असूनही त्यांना ऑगस्टपासून वेतन दिलेले नाही. प्रशासनाने जुलै २०२० या महिन्याचे वेतन ७ ऑक्टोबरला देताना सक्तीच्या रजेवर पाठविलेल्या कामगारांपैकी काही कामगारांचे रजा कालावधीचे वेतन कपात केल्यामुळे एक महिन्याचे वेतनही अल्प प्रमाणात दिलेले आहे.दिवाळी सणापूर्वी दोन महिन्यांचे थकित वेतन, महागाई भत्त्याची थकबाकी व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल मिळावी या मागणीसाठी संघटनेचे पदाधिकारी सर्व पातळीवर लक्ष वेधण्यासाठी व एसटी कामगारांना वेतन मिळण्यासाठी २ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन देतील. त्यानंतरही वेतन न मिळाल्यास पगार दो... आक्रोश आंदोलन छेडण्यात येईल, असेही साटम यांनी म्हटले आहे.वेतन नसल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोषकामगारांमध्ये असलेल्या असंतोषाबाबत संघटनेने वारंवार पत्रव्यवहार करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मात्र, प्रशासनाने हा थकित महागाई भत्ता राज्य परिवहन कामगारांना कामगार कराराच्या तरतुदीनुसार दिलेला नाही. त्यामुळे कामगारांतून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

सध्याच्या एसटीच्या बिकट आर्थिक परिस्थितीस कामगार जबाबदार नाहीत. कोरोनाच्या कालावधीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कामगार काम करीत असूनही त्यांनी केलेल्या कामाचे वेतन त्यांना मिळत नसल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष वाढला आहे.

टॅग्स :state transportएसटीsindhudurgसिंधुदुर्ग